जालना शहरात पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. शहरातील निलम टॉकीज परिसरातील किमान 50 दुकानात पाणी शिरले आहे. ग्राऊंड फ्लोअरला असलेल्या या दुकानात पाच ते सहा फूट पाणी साचून आहे. त्याचबरोबर भाग्यनगर येथील 20 ते 25 घरात रस्त्यावरील पावसाचे पाणी जमा झाले आहे.
Chhatrapati Sambhajinagar: कर्णपुरा यात्रेचं टेंडर कोटीच्या घरात! कोणाच्या तिजोरीत जाणार पैसे?
advertisement
जालना छत्रपती संभाजीनगर मार्गांवर देखील तीन फुटांपर्यंत पाणी साचल्याने वाहतूक खोळंबली आहे. अवजड वाहने एकाच लेनमधून प्रवास करत असल्याचे पहायला मिळत आहे. येथील सिग्नलजवळ मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. त्याचबरोबर टोलनाका जवळील रस्त्यावर देखील पाणी साचल्याने वाहतूक कोंडी होत आहे.
दरम्यान, जालना शहरात मागील पन्नास वर्षांत झाला नाही एवढा पाऊस एका रात्रीत झाल्याचे हवामान अभ्यासक आणि खरपुडी कृषी विज्ञान केंद्र येथील शास्त्रज्ञ पंडित वासरे यांनी सांगितले. रात्री 12 ते 3 या केवळ तीनच तासांत 116.2 मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे वासरे यांनी लोकल 18 शी बोलताना सांगितले.