अफगाणिस्तानच्या दौऱ्याचे अधिकृत वेळापत्रक जाहीर
बीसीसीआयने अफगाणिस्तानच्या भारत दौऱ्याचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केलं असून, ही मालिका जून 2026 मध्ये खेळवली जाणार आहे. या दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये एक ऐतिहासिक कसोटी आणि तीन सामन्यांची वनडे मालिका रंगणार आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या मोठ्या स्पर्धांच्या तयारीसाठी अफगाणिस्तानविरुद्धची ही वनडे मालिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या मालिकेचे नियोजन बीसीसीआयने अशा पद्धतीने केले आहे की खेळाडूंना विश्रांतीनंतर लगेच लय प्राप्त करता येईल.
advertisement
एकमेव कसोटी मॅच खेळवणार
वेळापत्रकानुसार, भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी मॅच 6 जून ते 10 जून दरम्यान खेळवली जाईल. त्यानंतर 14 जूनपासून तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात होणार असून ही मालिका 20 जूनपर्यंत चालेल. या दोन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघ अफगाणिस्तानच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी सज्ज झाला असून चाहत्यांमध्ये या सामन्यांबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
अफगाणिस्तानचा भारत दौरा 2026
पहिली कसोटी - 6 ते 10 जून, मुल्लानपूर.
पहिली एकदिवसीय - 14 जून, धर्मशाला.
दुसरी एकदिवसीय - 17 जून, लखनऊ.
तिसरी एकदिवसीय - 20 जून, चेन्नई.
2018 नंतर पहिलीच कसोटी मॅच
विशेष म्हणजे, 2018 नंतर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात होणारी ही पहिलीच कसोटी मॅच असेल. 2018 मध्ये झालेल्या शेवटच्या कसोटीत भारतीय टीमने एक डाव आणि 262 रन्सनी मोठा विजय मिळवला होता. त्या मॅचमध्ये शिखर धवनने 107 रन्सची तुफानी खेळी केली होती आणि अजिंक्य रहाणेने भारतीय टीमचे नेतृत्व केले होते. आता प्रदीर्घ काळानंतर हे दोन संघ पुन्हा एकदा रेड बॉल क्रिकेटमध्ये आमनेसामने येतील.
