TRENDING:

रोहित पुन्हा घरच्या मैदानावर दिसणार, BCCI मास्टर प्लॅन; टीम इंडिया 22 मॅच खेळणार, संपूर्ण वेळापत्रक

Last Updated:

India Schedule: भारतीय क्रिकेट संघाचा 2026-27 हंगामात घरच्या मैदानावर कार्यक्रम ठरला असून 17 ठिकाणी 22 आंतरराष्ट्रीय सामने खेळवले जाणार आहेत. वेस्ट इंडिजपासून सुरुवात होत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेपर्यंत रोमांचक क्रिकेट पाहायला मिळणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) गुरुवारी भारतीय क्रिकेट संघाच्या 2026-27 च्या घरच्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर केले. येत्या हंगामात भारत 17 वेगवेगळ्या मैदानांवर एकूण 22 आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे. वेस्ट इंडिज, श्रीलंका, झिम्बाब्वे आणि ऑस्ट्रेलिया या चार संघांचा भारत दौरा या हंगामात होणार आहे.
News18
News18
advertisement

वेस्ट इंडिज दौरा: सप्टेंबर-ऑक्टोबर 2026

घरच्या हंगामाची सुरुवात वेस्ट इंडिजच्या व्हाईट-बॉल दौऱ्याने होणार आहे. या दौऱ्यात 5 एकदिवसीय आणि 3 T20I सामने होतील. पहिला सामना 27 सप्टेंबर रोजी तिरुवनंतपुरम येथे होणार असून संपूर्ण मालिका 17 ऑक्टोबरपर्यंत चालेल.

एकदिवसीय सामन्यांची ठिकाणे: तिरुवनंतपुरम, गुवाहाटी, नवी चंदीगड

T20I सामन्यांची ठिकाणे: लखनऊ, रांची, इंदूर, हैदराबाद, बेंगळुरू

advertisement

विशेष म्हणजे बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय सामना ऑक्टोबर 2024 नंतर प्रथमच होणार आहे.

क्र. दिवस तारीख वेळ सामना स्थळ
1 रवि 27 सप्टेंबर 2026 दुपारी 2:00 पहिला वनडे तिरुवनंतपुरम
2 बुध 30 सप्टेंबर 2026 दुपारी 2:00 दुसरा वनडे गुवाहाटी
3 शनि 03 ऑक्टोबर 2026 दुपारी 2:00 तिसरा वनडे न्यू चंदीगड
4 मंगळ 06 ऑक्टोबर 2026 सायं 7:00 पहिला टी-20 लखनऊ
5 शुक्र 09 ऑक्टोबर 2026 सायं 7:00 दुसरा टी-20 रांची
6 रवि 11 ऑक्टोबर 2026 सायं 7:00 तिसरा टी-20 इंदूर
7 बुध 14 ऑक्टोबर 2026 सायं 7:00 चौथा टी-20 हैदराबाद
8 शनि 17 ऑक्टोबर 2026 सायं 7:00 पाचवा टी-20 बेंगळुरू

advertisement

श्रीलंका दौरा: डिसेंबर 2026

वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर श्रीलंका संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात 3 एकदिवसीय आणि 3 T20I सामने होतील. ही मालिका 13 ते 27 डिसेंबर दरम्यान खेळवली जाईल.

एकदिवसीय सामन्यांची ठिकाणे: दिल्ली, बेंगळुरू, अहमदाबाद

T20I सामन्यांची ठिकाणे: राजकोट, कटक, पुणे

क्र. दिवस तारीख वेळ सामना स्थळ
1 रवि 13 डिसेंबर 2026 दुपारी 2:00 पहिला वनडे दिल्ली
2 बुध 16 डिसेंबर 2026 दुपारी 2:00 दुसरा वनडे बेंगळुरू
3 शनि 19 डिसेंबर 2026 दुपारी 2:00 तिसरा वनडे अहमदाबाद
4 मंगळ 22 डिसेंबर 2026 सायं 7:00 पहिला टी-20 राजकोट
5 गुरु 24 डिसेंबर 2026 सायं 7:00 दुसरा टी-20 कटक
6 रवि 27 डिसेंबर 2026 सायं 7:00 तिसरा टी-20 पुणे

advertisement

झिम्बाब्वे दौरा: जानेवारी 2027

नवीन वर्षाच्या सुरुवातीला झिम्बाब्वे संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका होईल.

एकदिवसीय सामन्यांची ठिकाणे: कोलकाता, हैदराबाद, मुंबई

क्र. दिवस तारीख वेळ सामना स्थळ
1 रवि 03 जानेवारी 2027 दुपारी 2:00 पहिला वनडे कोलकाता
2 बुध 06 जानेवारी 2027 दुपारी 2:00 दुसरा वनडे हैदराबाद
3 शनि 09 जानेवारी  2027 दुपारी 2:00 तिसरा वनडे मुंबई

advertisement

ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका: जानेवारी ते मार्च 2027

घरच्या हंगामातील सर्वात महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची मालिका बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी होय. ऑस्ट्रेलियाविरुद्धची 5 कसोटी सामन्यांची मालिका 21 जानेवारी ते 7 मार्च 2027 दरम्यान खेळवली जाईल.

कसोटी सामन्यांची ठिकाणे:

नागपूर, चेन्नई, गुवाहाटी, रांची, अहमदाबाद

क्र. दिवस तारीख (पासून) तारीख (पर्यंत) वेळ सामना स्थळ
1 गुरु 21 जानेवारी 2027 25 जानेवारी 2027 सकाळी 9:30 पहिली कसोटी नागपूर
2 शुक्र 29 जानेवरी 2027 02 फेब्रुवारी 2027 सकाळी 9:30 दुसरी कसोटी चेन्नई
3 गुरु 11-फेब्रुवारी-2027 15 फेब्रुवारी 2027 सकाळी 9:00 तिसरी कसोटी गुवाहाटी
4 शुक्र 19-फेब्रुवारी-2027 23 फेब्रुवारी 2027 सकाळी 9:30 चौथी कसोटी रांची
5 शनि 27-फेब्रुवारी-2027 03 मार्च 2027 सकाळी 9:30 पाचवी कसोटी अहमदाबाद

एका दृष्टिक्षेपात संपूर्ण हंगाम

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अशी ही रुग्णसेवा, छ. संभाजीनगरमध्ये गरजूंना होतीये मोठी मोफत मदत, अनोखा उपक्रम काय?
सर्व पहा

मालिका कालावधी सामने
वेस्ट इंडिज (ODI+T20I) 27 सप्टेंबर-17 ऑक्टोबर 2026 5 ODI + 3 T20I
श्रीलंका (ODI+T20I) 13-27 डिसेंबर 2026 3 ODI + 3 T20I
झिम्बाब्वे (ODI) जानेवारी 2027 3 ODI
ऑस्ट्रेलिया (कसोटी) 21 जानेवारी-07 मार्च 2027 5 कसोटी
एकूण २२ सामने

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
रोहित पुन्हा घरच्या मैदानावर दिसणार, BCCI मास्टर प्लॅन; टीम इंडिया 22 मॅच खेळणार, संपूर्ण वेळापत्रक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल