आशिया कपच्या या फायनल सामन्याआधी टीम इंडियाचा स्टार गोलंदाज चमकला आहे. त्याने एकट्याने एका सामन्यात 10 विकेट घेतल्या आहेत.त्यामुळे त्याच्या गोलंदाजीची प्रचंड चर्चा रंगली आहे.
advertisement
हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून राहुल चहर आहे. राहुल चहर संध्या काऊंटी चॅम्पियन्सशीप खेळतोय. या स्पर्धेत सरे संघाकडून खेळताना त्याने एका सामन्यात 10 विकेट काढल्या आहेत.
काऊंटी स्पर्धेत सरे विरूद्ध हॅम्पशायर यांच्यात सामना रंगला होता.हा सामना सरे संघाने 20 धावांनी जिंकला आहे. संघाच्या या विजयात राहुल चहरचा मोलाचा वाटा आहे.
कारण राहुल चहरने पहिल्या डावात 2 विकेट काढल्या होत्या. तर दुसऱ्या डावात तर तो हॅम्पशायरचा कर्दनकाळच ठरला. कारण त्याने एकट्याने दुसऱ्या डावात 8 विकेट काढल्या आहेत.
विशेष म्हणजे राहुल चहरचा हा काउंटी क्रिकेटमधील पहिला सामना होता. आणि या पहिल्याच सामन्यात त्याने गोलंदाजीत उत्कृष्ट प्रदर्शन केलं आहे.
राहुल चहर हा भारतीय संघाचा भाग नाही आहे.वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी देखील त्याची निवड झालेली नाही आहे. पण त्याने या गोलंदाजी बळावर निवड समितीचे लक्ष वेधून घेतले आहे.