अरुंधती खेळपट्टीवरच कोसळल्याचं लक्षात येताच डॉक्टर लगेचच मैदानात आले आणि त्यांनी अरुंधतीला मैदानाबाहेर घेऊन जायचा प्रयत्न केला, पण अरुंधतीला चालणंही शक्य होत नसल्यामुळे अखेर व्हीलचेअर मागवण्यात आली. टीम इंडियाच्या वर्ल्ड कप मोहिमेला 30 सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. भारताचा पहिला सामना गुवाहाटीमध्ये श्रीलंकेविरुद्ध होणार आहे, पण त्याआधीच भारताच्या फास्ट बॉलिंगचा महत्त्वाचा भाग असणाऱ्या अरुंधतीला दुखापत झाली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यासाठा अरुंधती फिट होईल का नाही? याबाबत अजून काहीही स्पष्टता आलेली नाही.
advertisement
अरुंधती रेड्डीच्या आधीही टीम इंडियाला धक्का लागला होता. विशाखापट्टणममध्ये आयोजित ट्रेनिंग कॅम्पवेळी यास्तिका भाटियाला दुखापत झाली होती. यास्तिका भाटिया जानेवारी-फेब्रुवारी 2026 च्या महिला प्रीमियर लीगआधीही फिट व्हायची शक्यता कमी आहे. यास्तिका भाटियाऐवजी उमा छेत्रीची टीम इंडियात निवड करण्यात आली आहे.
टीम इंडियाच्या 15 सदस्यांमध्ये रेणुका ठाकूर भारताच्या फास्ट बॉलिंगचं नेतृत्व करत आहे. 5 महिने मैदानाबाहेर राहिल्यानंतर रेणुकाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सीरिजमध्ये कमबॅक केलं. तर दुसरीकडे मिडियम फास्ट बॉलिंग ऑलराऊंडर असलेली अमनजोत कौर भारताच्या इंग्लंड दौऱ्यातील वनडे सीरिजमध्ये बाहेर झाल्यानंतर अजूनही मॅच खेळलेली नाही. अमनजोतला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सीरिजसाठी आराम देण्यात आला होता. यानंतर ती बंगळुरूमध्ये ट्रेनिंगसाठी टीम इंडियासोबत आली. क्रांती गौड भारताच्या वर्ल्ड कप टीममधली 15 खेळाडूंमधली एकमात्र अन्य फास्ट बॉलर आहे.