India vs Australia : भारताने ऑस्ट्रेलिया विरूद्ध वनडे मालिका 2-1 ने गमावली, तर पाच सामन्यांची टी20 मालिका भारताने 2-1 ने जिंकली आहे.अशाप्रकारे भारताचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मालिका दौऱ्याचा विजयाने शेवट झाला. या मालिकेनंतर भारताचे पुढचे नेमके सामने कधी आहे? भारत कुणासोबत भिडणार आहे? हे जाणून घेऊयात.
advertisement
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर आता टीम इंडिया मायदेशी जाणार आहे. मायदेशी भारत साऊथ आफ्रिकेशी भिडणार आहे. या सामन्याला अवघ्या सहा दिवसातच सूरूवात होणार आहे. यामध्ये भारत पहिल्यांदा साऊथ आफ्रिकेसोबत दोन सामन्यांची टेस्ट मालिका, तीन सामन्यांची वनडे मालिका आणि पाच टी20 मालिका खेळणार आहे. हे सामने नेमके कोणत्या दिवशी असणार आहेत.हे पाहूयात.
पाचवा टी20 कसा रंगला
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर प्रथम फलंदाजी करताना भारताची सूरूवात चांगली झाली होती. भारताचे शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा हे दोन्हीही सलामीवीर यांनी डावाला चांगली सूरूवात करून दिली होती. भारत ज्यावेळेस 4.5 ओव्हरमध्ये 54 धावा करून खेळत होता,त्यावेळेस मैदानात पावसाची एंन्ट्री झाली आणि सगळा खेळ बिघडला. या दरम्यान अभिषेक शर्मा 23 आणि शुभमन गिल 29 धावांवर नाबाद राहिला होता.दरम्यान नंतर पुढे सामना सूरु होण्याची शक्यता कमी होती त्यामुळे सामना रद्द करण्यात आला आणि भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची टी20 आंतरराष्ट्रीय मालिका 2-1 ने जिंकली.
टेस्ट मालिका
पहिला टेस्ट : भारत आणि साऊथ आफ्रिका, 14 नोव्हेंबर 2025 (कोलकत्ता ईडन गार्डन )
दुसरा टेस्ट : भारत आणि साऊथ आफ्रिका, 22 नोव्हेंबर 2025 (बारसपारा स्टेडिअम)
वनडे मालिका
पहिला वनडे : 30 नोव्हेंबर 2025 रांची जेएससीएच्या मैदानावर
दुसरा वनडे : 3 डिसेंबर 2025 , रायपूर शहीद वीर नारायण स्टेडिअम
तिसरा वनडे : 6 डिसेंबर 2025 विशाखापट्टणन एसीए वीडीसीए क्रिकेट स्टेडिअम
टी20 सामन्याचे वेळापत्रक
पहिला टी20 : 9 डिसेंबर 2025, कटक बाराबती स्टेडियम
दुसरा टी20 : 11 डिसेंबर 2025, महाराजा यादविंद्र सिंह स्टेडियम,मुल्लानपूर
तिसरा टी20 : 14 डिसेंबर 2025, एचपीसीए स्टेडियम, धर्मशाला
चौथा टी20 : 17 डिसेंबर 2025, एकाना स्टेडियम, लखनऊ
पाचवा टी20 : 19 डिसेंबर 2025, नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद
भारताचा कसोटी संघ:
शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उप कर्णधार/विकेटकिपर), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, नितीश कुमार, मोहम्मद सिराज. कुलदीप यादव, आकाशदिप
