TRENDING:

भारताच्या गोंगाडी त्रिशाची ऐतिहासिक कामगिरी, विक्रमी शतकाने संपूर्ण जगभरात पोहोचले नाव

Last Updated:

Trisha Gongadi Century: आयसीसी 19 वर्षाखालील महिलांच्या T-20 वर्ल्डकपमध्ये भारताने स्कॉटलंडचा पराभव करत सेमीफायनलमध्ये स्थान मिळवले. या सामन्यात भारताच्या गोंगाडी त्रिशाने ऐतिहासिक शतकी खेळी केली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली: आयसीसी १९ वर्षाखालील महिला टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाची धमाकेदार कामगिरी सुरूच आहे. सुपर सिक्समध्ये झालेल्या अखेरच्या लढती टीम इंडियाने स्कॉटलंडचा १५० धावांनी विजय मिळवत सेमीफायनलमध्ये स्थान निश्चित केले. या सामन्यात भारताच्या गोंगाडी त्रिशाने ऐतिहासिक अशी कामगिरी केली ज्याची जगभरात चर्चा सुरू आहे.
News18
News18
advertisement

स्कॉटलंड संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताच्या सलामीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी १४७ धावांची भागिदारी केली. तर गोंगाडी त्रिशाने ५९ चेंडूत ४ षटकार आणि १३ चौकारांसह नाबाद ११० धावा केल्या. महिलांच्या १९ वर्षाखालील वर्ल्डकपमध्ये शतक करणारी ती जगातील पहिली फलंदाज ठरली आहे. याआधी अशी कामगिरी कोणालाही करता आलेली नाही.

advertisement

तिसऱ्या मॅचमध्ये इंग्लंडचे काही खरे नाही! सर्वात घातक गोलंदाजाला दिले स्थान

त्रिशाने या सामन्यात आक्रमक फलंदाजी केली. तिने फक्त २७ चेंडूत ९ चौकार आणि १ षटकारासह अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर १८व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर शतक पूर्ण केले. त्रिशाने ५३ चेंडूत १०० धावा केल्या.

भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटाकत २०८ धावा केल्या. वर्ल्डकपमध्ये ही कोणत्याही संघाने केलेली सर्वोच्च धावसंख्या आहे. त्यानंतर फलंदाजीत धमाकेदार कामगिरी केल्यानंतर संघाच्या गोलंदाजांनी कमाल केली. स्कॉटलंडचा फक्त १४ षटकात ५८ धावांवर ऑलआउट केला आणि तब्बल १५० धावांनी विजय साकारला.

advertisement

भारताकडून  आयुषी शुक्लाने 3 षटकांत फक्त आठ धावा देत चार विकेट घेतल्या.  वैष्णवी शर्मा आणि गोंगाडी त्रिशा यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
स्वतःवर विश्वास ठेवला अन् स्वप्न साकार झालं, शेतकऱ्याच्या मुलगा झाला DYSP, Video
सर्व पहा

सेमीफायलमध्ये आता भारताची लढत इंग्लंडविरुद्ध ३१ जानेवारी रोजी होणार आहे. स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे. पहिल्या वर्षी भारताने इंग्लंडचा पराभव करून विजेतेपद मिळवले होते. आता माजी विजेते आणि उपविजेते सेमीफायनलमध्ये एकमेकांविरुद्ध आले आहेत. दुसऱ्या सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लढत होणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
भारताच्या गोंगाडी त्रिशाची ऐतिहासिक कामगिरी, विक्रमी शतकाने संपूर्ण जगभरात पोहोचले नाव
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल