मी मागच्या 12 महिन्यांपासून वैभव सूर्यवंशीचा गेम जवळून पाहत आहे.तो खूपच उत्कृष्ट खेळाडू आहे. पण तुम्ही जर त्याला बॅटींग करताना पाहिलं तर तो त्याच्या नशीबाच्या (Luck) जोरावर बॅटींग करताना दिसतो,असे भारताचा दिग्गज क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा स्टार स्पोर्टसवर बोलला आहे.
वैभव सूर्यवंशीमधली नवीनता आता कमी झाली आहे.त्यामुळे तो त्याच्या नशीबाच्या जोरावर बॅटींग करतो आहे. त्यामुळे हा हंगाम त्याच्यासाठी शिकण्यासारखा असणार आहे.आणि याचा त्याला मोठा फायदा होईल. पण मला वाटत नाही तो गेल्या वर्षीसारखा खेळेल,असे रॉबीन उथप्पा म्हणतो.
advertisement
राजस्थान रॉयल्सकडून खेळताना वैभव सूर्यवंशीने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत पहिल्याच बॉलवर षटकार मारला होता.दोन सामन्यानंतर वैभव सूर्यवंशीने गुजरात टायटन्स विरूद्ध 35 बॉलमध्ये शतक ठोकले होते. वैभव सूर्यवंशीने आयपीएल 2025 मध्ये सात सामन्यांमध्ये 206.55 च्या स्ट्राईक रेटने 252 धावा केल्या होत्या. या हंगामात 100 पेक्षा जास्त धावा करणाऱ्या इतर कोणत्याही खेळाडूचा स्ट्राईक रेट 200 पेक्षा जास्त नव्हता.
दरम्यान मागच्या हंगामात वैभव सूर्यवशीला खुप उशिराने मैदानात उतरण्याची संधी मिळाली होती. पण वर्षभरातील त्याची कामगिरी पाहता त्याला सुरूवातीच्या सामन्यापासून त्याला खेळवले जाईल.त्यामुले तो यशस्वी जयस्वालसोबत पुन्हा एकदा फलंदाजी करताना दिसणार आहे. तसेच संजू सॅमसन बाहेर पडल्याने रविंद्र जडेजाची संघात एंन्ट्री झाली आहे. तर या संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी ही रियान परागकडे असणार आहे.त्यामुळे परागच्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्स कशी कामगिरी करते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
