TRENDING:

Vaibhav Suryavanshi : 15 वर्षांचा झाला वैभव सूर्यवंशी, टीम इंडियाच्या एन्ट्रीसाठी दरवाजं खुली! सचिनचा रेकॉर्ड मोडणार?

Last Updated:

Vaibhav suryavanshi Birthday : आयसीसीच्या (ICC) नियमांनुसार, कोणत्याही खेळाडूला सीनियर स्तरावर इंटरनॅशनल क्रिकेट खेळण्यासाठी किमान 15 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Vaibhav suryavanshi Age : टीम इंडियाचा युवा स्टार बॅटर वैभव सूर्यवंशी याने मागील दोन वर्षांपासून क्रिकेटविश्वात धुमाकूळ घातलाय. अनेक असंख्य रेकॉर्ड त्याने मोडकळीस आणले अन् मोडले सुद्धा... तसेच अंडर 19 टीमला देखील वर्ल्ड कप जिंकवून दिला. त्यामुळे आता बीसीसीआयच्या आशा उंचावल्या आहेत. त्याला लवकरात लवकर टीम इंडियासाठी खेळवण्याची तयारी सुरू झाली आहे. आतापर्यंत बीसीसीआय इच्छा असूनही वैभवची सीनियर टीममध्ये निवड करू शकत नव्हती, पण आता निवडकर्त्यांचे हात मोकळे झाले आहेत.
Vaibhav suryavanshi Birthday turns into 15 age
Vaibhav suryavanshi Birthday turns into 15 age
advertisement

आयसीसीचा 2020 चा नियम

आयसीसीच्या (ICC) कडक नियमांनुसार, कोणत्याही खेळाडूला सीनियर स्तरावर इंटरनॅशनल क्रिकेट खेळण्यासाठी किमान 15 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. हा नियम 2020 मध्ये युवा खेळाडूंवर येणारा शारीरिक आणि मानसिक दबाव टाळण्यासाठी लागू करण्यात आला होता. वैभव सूर्यवंशीचा जन्म 27 मार्च 2011 रोजी झाला असून, तो आज 15 वर्षांचा झाला आहे. त्यामुळे आजपासून त्याला सिनियर मेन्स संघासोबत इंटरनशॅनल क्रिकेट खेळता येणार आहे.

advertisement

सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडणार?

सचिनने 16 वर्षे 205 दिवस वय असताना पाकिस्तानविरुद्ध इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये डेब्यू केला होता. जर वैभवने पुढच्या एका वर्षाच्या आत टीम इंडियासाठी पदार्पण केले, तर तो सचिन तेंडुलकरचा 'सर्वात तरुण भारतीय खेळाडू' हा ऐतिहासिक रेकॉर्ड मोडीत काढू शकतो. हा क्षण भारतीय क्रिकेटसाठी अत्यंत अभिमानास्पद असेल. वैभव जर असाच खेळत राहिला तर तो आगामी अनेक रेकॉर्ड मोडू शकेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

advertisement

करिअरला एक नवी गती मिळणार

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सलाम! ‘ते’ दृश्य पाहिलं अन् कार घ्यायचा प्लॅन रद्द केला, थेट ॲम्ब्युलन्स घेतली, नववी पास महिलेचं मोठं काम, Video
सर्व पहा

दरम्यान, वैभवची आतापर्यंतची कामगिरी पाहता तो लवकरच निळ्या जर्सीमध्ये दिसण्याची दाट शक्यता आहे. पीचवर त्याची बॅटिंग पाहून अनेक जाणकार त्याला भविष्यातील सुपरस्टार मानत आहेत. 15 वर्षे पूर्ण होताच आता त्याच्या करिअरला एक नवी गती मिळणार आहे. संपूर्ण देशाचे लक्ष आता निवड समितीच्या निर्णयाकडे लागले आहे. बीसीसीआय आता कोणता निर्णय घेणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचलीये.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Vaibhav Suryavanshi : 15 वर्षांचा झाला वैभव सूर्यवंशी, टीम इंडियाच्या एन्ट्रीसाठी दरवाजं खुली! सचिनचा रेकॉर्ड मोडणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल