TRENDING:

Vinesh Phogat : 100 ग्रॅममुळे ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक हुकलेल्या विनेश फोगाटचा यु-टर्न! सोशल मीडियावर केली मोठी घोषणा

Last Updated:

Vinesh Phogat Reverse Retirement For LA28 Olympics : भारताची स्टार महिला कुस्तीगीर विनेश फोगटने आगामी लॉस एँजेलिसच्या ऑलिम्पिक्समध्ये खेळण्याची तयारी दर्शविली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Vinesh Phogat Reverse Retirement : भारताची स्टार महिला कुस्तीगीर विनेश फोगटने आगामी ऑलिंपिकमध्ये पदक मिळविण्यासाठी निवृत्ती मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक्समध्ये विनेश फोगाटला 100 ग्रॅम वजन जास्त भरल्याने तिला अपात्र घोषित करण्यात आलं होतं. त्यानंतर भावनेच्या भरात तिने निवृत्ती जाहीर केली होती. अशातच आता तिने आगामाी लॉस एँजेलिसच्या ऑलिम्पिक्समध्ये खेळण्याची तयारी दर्शविली आहे.
Vinesh Phogat Reverse Retirement For LA28 Olympics
Vinesh Phogat Reverse Retirement For LA28 Olympics
advertisement

विनेश फोगाटची मोठी घोषणा

पॅरिस ही माझ्या प्रवासाचा अखेर असेल का? असे प्रश्न लोकांनी विचारले होते, पण माझ्याकडे उत्तर नव्हते, असं तिनं म्हटलं आहे. मॅट पासून, दबावापासून, अपेक्षांपासून आणि माझ्या स्वतःच्या महत्त्वाकांक्षेपासून दूर जाण्यासाठी मला वेळ हवा होता, असे सांगत तिने लॉस एंजेलिस ऑलिम्पिकच्या तयारीसाठी पुनरागमन करण्याची मोठी घोषणा केली आहे.

advertisement

आत्मपरीक्षणमध्ये मला सत्य सापडले - विनेश

विनेशने सांगितले की, तिने काही काळ स्वतःला श्वास घेण्याची परवानगी दिली. तिने माझ्या प्रवासाचे वजन, माझे यश, दु:ख आणि माझ्या त्या रूपांना समजून घेतले जे जगाने कधी पाहिले नाही. या आत्मपरीक्षणमध्ये मला सत्य सापडले. माझे या खेळावर अजूनही प्रेम आहे. मला अजूनही स्पर्धा करायची आहे.

advertisement

शिस्त, दिनक्रम आणि लढण्याची वृत्ती..

खेळाप्रती माझी आग कधीच विझली नव्हती. ती केवळ थकवा आणि आवाजाखाली दबली होती. तिने सांगितले की, शिस्त, नेमका दिनक्रम, लढण्याची वृत्ती... हे माझ्या सिस्टममध्ये आहे. मी कितीही दूर गेले असले तरी, माझा एक भाग मॅट वरच राहिला आहे, असंही 100 ग्रॅम वजन जास्त असल्याने फायनल खेळू शकणाऱ्या विनेश फोगाटने म्हटलं आहे.

advertisement

माझा मुलगा माझ्या टीममध्ये...

विनेशने शेवटी घोषणा केली की, ती आता निर्भीड मनाने आणि न झुकणाऱ्या आत्मविश्वासाने लॉस एंजेलिस ऑलिम्पिकच्या दिशेने परत येत आहे. तिने या वेळी आणखी एक भावनिक गोष्ट जोडली. विनेश म्हणाली, "या वेळी मी एकटी नाहीये. माझा मुलगा माझ्या टीममध्ये सामील होत आहे, माझी सर्वात मोठी प्रेरणा, माझा छोटा चीअरलीडर लॉस एंजेलिस ऑलिम्पिकच्या या रस्त्यावर माझ्यासोबत असेल, असंही ती म्हणाली.

पॅरिस ऑलिम्पिक्समध्ये काय घडलं होतं?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पगारात घरखर्च भागत नव्हता, शिक्षकानं सुरू केला बिर्याणी व्यवसाय, लाखभर कमाई
सर्व पहा

दरम्यान, महिलांच्या 50 किलो वजनी कुस्ती गटात विनेशने अंतिम मॅच गाठून इतिहास रचला होता आणि भारताचे पदक निश्चित केलं होतं. मात्र, अंतिम मॅच पूर्वी झालेल्या वजन तपासणीत ती अपात्र ठरली, ज्यामुळे तिचे सुवर्णपदकाचे स्वप्न भंगलं. अंतिम मॅच पूर्वी झालेल्या अनिवार्य वजन तपासणीत विनेश चे वजन 50 किलो वजनी गटाच्या मर्यादेपेक्षा 100 ते 150 ग्रॅम जास्त भरले. नियमानुसार, तिला अपात्र ठरवलं गेलं अन् तिचं सुवर्णपदकाचं स्वप्न भंगलं. या घटनेनंतर विनेश प्रचंड भावनिक झाली आणि डिहायड्रेशन मुळे ती चक्कर येऊन बेशुद्ध पडली, ज्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करावे लागलं होतं.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Vinesh Phogat : 100 ग्रॅममुळे ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक हुकलेल्या विनेश फोगाटचा यु-टर्न! सोशल मीडियावर केली मोठी घोषणा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल