सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एएमपी स्पोर्ट्स ऍन्ड एंटरटेन्मेंट चे संस्थापक इंद्रनील दास ब्लाह यांनी आरसीबीच्या विक्रीच्या निर्णयावर प्रकाश टाकला आहे. 'आरसीबी 2025 पर्यंत कोणतीही ट्रॉफी जिंकली नव्हती, पण तरीही टीम टॉप 3 ब्रॅन्ड मध्ये होती. विराट कोहलीची निवृत्ती लवकरच होणार आहे, त्यामुळे फ्रॅन्चायजीची ब्रॅन्ड व्हॅल्यूही कमी होईल. हा तोटा टाळण्यासाठी सध्याचे मालक लवकर बाहेर पडू इच्छित आहेत', असं इंद्रनील दास ब्लाह म्हणाले आहेत.
advertisement
विराट आरसीबीच्या विक्रीचं कारण?
विराट कोहलीमुळे आरसीबी एकही ट्रॉफी न जिंकता, टॉप-3 ब्रॅन्ड झाली. विराटची निवृत्ती होईल, तेव्हा नक्कीच टीमची ब्रॅन्ड व्हॅल्यू कमी होईल, असं टीमच्या मालकांना वाटत आहे. विराट कोहली आयपीएलच्या पहिल्या मोसमापासून आरसीबीकडून खेळत आहे. तेव्हापासूनच तो आरसीबीचा पोस्टर बॉय आहे. आयपीएल 2025 जिंकल्यानंतर आरसीबीची ब्रॅन्ड व्हॅल्यूदेखील वाढली आहे. 2024 मध्ये आरसीबीची ब्रॅन्ड व्हॅल्यू 227 मिलियन डॉलर होती, जी 18.5 टक्क्यांनी वाढून 269 मिलियन डॉलर झाली आहे.
विराटने केला नाही करार
दुसरीकडे आयपीएल रिटेनशन आधी विराट कोहलीने आरसीबीसोबत करार केला नसल्याचं वृत्तही समोर आलं आहे. विराट कोहलीने काही वर्षांपूर्वीच आपण आरसीबीमधूनच निवृत्त होणार असल्याचं आणि दुसऱ्या टीमकडून खेळणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. आरसीबीची विक्री झाली, तर टीमचे मालक आणि टीमचं नावही बदललं जाण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आयपीएलमधलं आरसीबीचं अस्तित्वही संपेल, त्यामुळेच विराटने करार केला नाही का? आरसीबीची विक्री होत असेल तर विराट आयपीएलमधूनही रिटायरमेंट घेणार का? अशी भीती त्याच्या चाहत्यांनी व्यक्त केली आहे.
