TRENDING:

वर्ध्याच्या तरुणांचा दक्षिण आशियात डंका, 'सॅम्बो' स्पर्धेत मिळवलं मोठं यश

Last Updated:

बांगलादेशच्या ढाका येथे नुकतेच सेकंड साउथ एशियन सॅम्बो चॅम्पियनशिप स्पर्धा झाली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
वर्धा, 8 नोव्हेंबर: बांगलादेशच्या ढाका येथे सेकंड साउथ एशियन सॅम्बो चॅम्पियनशिप स्पर्धा झाली. यामध्ये वर्ध्यातील महावीर वरहारे आणि विक्रांत गव्हाणे या तरुणांनी मोठी कामगिरी केली. वरहारे यांनी कॉम्बॅक्ट सॅम्बोमध्ये (-98 kg) रौप्यपदक पटकावले तर विक्रांतने - 88 किलो वजनगटात कांस्य पदकाची कमाई केली. त्यामुळे वर्ध्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय. 1 ते 4 नोव्हेंबर 2023 दरम्यान झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रातील 4 स्पर्धकांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं. यात वर्ध्यातील दोघांनी सहभाग घेतला होता.
advertisement

दोन खेळाडूंची बाजी

वर्धा येथील महावीर वासुदेवराव वरहारे हे कॉम्बॅक्ट खेळाडू आहेत. त्यांनी (-98 kg) वजन गटात सीनियर कॅटेगिरी्त कॉम्बॅक्ट सॅम्बोमध्ये बांगलादेशच्या स्पर्धकावर मात करत सिल्वर मेडल मिळवलेय. तसेच मार्शल आर्ट खेळाडू विक्रांत विजय गव्हाणे यांनी (-88 kg) वजन गटात सीनियर कॅटेगिरी कॉम्बॅक्ट सॅम्बोमध्ये श्रीलंकेच्या स्पर्धकावर विजय मिळवून कांस्यपदक पटकावलं.

advertisement

विदर्भातील अनोखा एस्ट्रो क्लब, विद्यार्थ्यांनी बनवलेल्या दुर्बिणीतून होतंय अंतराळ दर्शन

View More

अशी केली स्पेर्धेची तयारी

सहावी ते सातवीत असताना पासून खेळाडू गव्हाणे यांनी मार्शल आर्ट्स मधील विविध खेळ खेळण्यास सुरुवात केली. त्यांना खेळण्यांमध्ये अधिकच रुची होती. त्यामुळे वेगवेगळ्या खेळांमध्ये त्यांनी सहभागी होऊन यश प्राप्त केलं. सध्या मार्शल आर्ट्स या प्रकारामध्ये मोडणाऱ्या सॅम्बो खेळाची तयारी करण्यासाठी ते स्वतःच्या फिटनेस कडे काळजीपूर्वक लक्ष देत असून वर्ध्यातील हनुमान टेकडीवर प्रॅक्टिस, रोज धावणे, उड्या मारणे, किकिंग तसेच त्यांच्या घरी देखील कीक बॅग असून त्यावर प्रॅक्टिस करतात. जिल्हा क्रीडा संकुल येथील हॉल मध्ये देखील नियमित प्रॅक्टिस केली जातेय, त्याचेच हे फळ असल्याचं ते सांगतात.

advertisement

वर्धेकरांसाठी अभिमानाची बाब

ही स्पर्धा वेगवेगळ्या वजन गटामध्ये घेतली जाते. ज्यात विक्रांत गव्हाणे यांनी -88 किलो वजन गटात कांस्य पदक प्राप्त केले आहे. तर कॉम्बॅक्ट खेळाडू महावीर वासुदेवराव वरहारे यांनी -98 किलो वजनगटात रौप्यपदक प्राप्त केले आहे. वर्ध्यातील दोन खेळाडूंनी विदेशात अतिशय चांगली कामगिरी बजावल्या बद्दल वर्ध्यात अभिनंदन करून सत्कारही करण्यात आला.

advertisement

दिव्यांग तरुणाच्या कल्पकतेचा जगभर डंका, मूकबधिर मुलांचं शिक्षण झालं सोप्पं, Video

काय म्हणाले कांस्य विजेते गव्हाणे?

कांस्यपदक प्राप्त केल्यानंतर खेळाडू गव्हाणे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या स्पर्धेत मी कांस्य पदक प्राप्त केलं असलं तरीही माझ्यासाठी आनंदाची अभिमानाची बाब असल्याचं ते सांगतात. वर्ध्यासारख्या छोट्या जिल्ह्यात अनेक खेळाडू तयार होऊन मार्शल आर्ट या खेळ प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. या खेळाडूंनी नावलौकिक मिळवावा यासाठी आम्हीही प्रयत्नशील असू अशा भावना प्रशिक्षक आणि यशस्वी खेळाडूंनी व्यक्त केल्या.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
वर्ध्याच्या तरुणांचा दक्षिण आशियात डंका, 'सॅम्बो' स्पर्धेत मिळवलं मोठं यश
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल