advertisement

Vaibhav Suryavanshi : 14 वर्षांच्या वैभवने रविंद्र जडेजाला घाम फोडला,नेटसमध्ये चोप चोप चोपलं, VIDEO

Last Updated:

चेन्नई सुपर किंग्जला पहिल्यांदाच सोडून राजस्थान रॉयल्समध्ये सामील झालेला रविंद्र जडेजा देखील कॅम्पमध्ये दाखल झाला आहे. यावेळी नेटसमध्ये 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीन रविंद्र जडेजाची प्रचंड धुलाई केली आहे.

ipl 2026 Vaibhav Suryavanshi
ipl 2026 Vaibhav Suryavanshi
Vaibhav Suryavanshi Ravindra Jadeja Net Practice : येत्या 28 मार्च 2026 पासून आयपीएल 2026 च्या हंगामाला सूरूवात होत आहे. या हंगामाआधी सर्वच संघ मैदानात कसून सराव करत आहे. चेन्नई सुपर किंग्जला पहिल्यांदाच सोडून राजस्थान रॉयल्समध्ये सामील झालेला रविंद्र जडेजा देखील कॅम्पमध्ये दाखल झाला आहे. यावेळी नेटसमध्ये 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीन रविंद्र जडेजाची प्रचंड धुलाई केली आहे.या धुलाईचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.
खरं तर रविंद्र जडेजाने त्याचा आयपीएल डेब्यू हा राजस्थान रॉयल्स संघातून केला होता.पण त्यानंतर तो अनेक काळ महेंद्र सिंह धोनीच्या सीएसकेतून खेळला होता. पण यंदाच्या हंगामासाठी त्याला सीएसकेने सोडले होते. ट्रेंड व्हिडिओ माध्यमातून सीएसकेने संजू सॅमसनला संघात घेण्यासाठी रविंद्र जडेजा आणि सॅम करनला सोडण्याचा निर्णय घेतला होता. अशाप्रकारे रविंद्र जडेजाची राजस्थान रॉयल्समध्ये घरवापसी झाली होती.
advertisement
राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यात नुकताच रविंद्र जडेजा दाखल झाला आहे.तसेच आयपीएलला आठवडा उरला असल्याने संघाने सरावाला देखील सूरूवात केली आहे.या सरावा दरम्यानचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये टीम इंडियाचा सिनिअर स्पिनर गोलंदाज रविंद्र जडेजा हा वैभव सूर्यवंशीला गोलंदाजी करताना दिसला आहे.
advertisement
नेटसमध्ये यावेळी 14 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीने रविंद्र जडेजाला घाम फोडला आहे. कारण वैभव सूर्यवंशीने रविंद्र जडेजाची प्रचंड धुलाई केली होती. मैदानाच्या चारही बाजूला त्याने फटकेबाजी केली होती. त्यामुळे हा व्हिडिओ पाहता वैभव सूर्यवंशीने रविंद्र जडेजाला चोप चोपलं आहे.त्यामुळे राजस्थान रॉयल्समध्ये दाखल झालेल्या रविंद्र जडेजाला वैभव सूर्यवंशीने त्याच्या स्टाईलमध्ये समाचार घेतला आहे.
advertisement
दरम्यान यंदाच्या हंगामात राजस्थान रॉयल्सकडून संजू सॅमसन चेन्नई सुपर किंग्जच्या ताफ्यात गेला आहे. त्यामुळे संजू सॅमसन गमावल्याचा राजस्थान रॉयल्सला किती फटका बसणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Vaibhav Suryavanshi : 14 वर्षांच्या वैभवने रविंद्र जडेजाला घाम फोडला,नेटसमध्ये चोप चोप चोपलं, VIDEO
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement