नक्वीच्या हॉटेलच्या खोलीत आशिया कपची ट्रॉफी?
भारतीय क्रिकेट बोर्डाचे सचिव देवजित सैकिया यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर भारताला आशिया कप ट्रॉफीसह आनंद साजरा करू न दिल्याबद्दल टीका केली आहे. रविवारी दुबईमध्ये भारताच्या 5 विकेटने विजयानंतर एएनआयशी बोलताना सैकिया म्हणाले की, नक्वी यांनी आशिया कप त्यांच्या हॉटेलच्या खोलीत घेऊन जाणं हे खेळाच्या भावनेविरुद्ध आहे. त्यामुळे नक्वीच्या हॉटेलच्या खोलीत आशिया कपची ट्रॉफी होती का? असा प्रश्न विचारला जात आहे.
advertisement
ट्रॉफी दुबईतील आयसीसीच्या मुख्यालयात...
पाकिस्तानच्या अध्यक्षांनी पळवलेली आशिया कपची ट्रॉफी ही सध्या दुबईतील आयसीसीच्या मुख्यालयात असल्याची माहिती समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊंसिलचं हेड क्वार्टर हे दुबई क्रिकेट स्टेडियमच्या बाजूलाच आहे. चार पावलांवर असलेल्या या मुख्यालयात ट्रॉफी ठेवण्यात आली आहे.
ट्रॉफीबाबत आयसीसीचा नियम काय आहे?
कर्णधाराने ट्रॉफी स्वीकारण्यास नकार देणं हे आयसीसीच्या आचारसंहितेअंतर्गत येऊ शकते, परंतु याबाबत कोणतेही विशिष्ट नियम नाहीत. ते क्रिकेटच्या भावनेविरुद्ध असू शकते. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवला त्याने ट्रॉफी का स्वीकारली नाही याचे स्पष्टीकरण द्यावे लागेल आणि त्यानंतर एसीसी किंवा आयसीसी कोणत्याही कारवाईचा निर्णय घेईल.