Navratri 2025: देवी समोर कोहळ्याचा बळी का दिला जातो? काय आहे नेमकी परंपरा?
- Published by:Vrushali Kedar
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
Navratri 2025: पूर्वीच्या काळी देवी देवतांना प्राण्यांचा बळी दिला जात असे. ही प्रथा काळाच्या ओघात बदलत गेली.
नाशिक: सध्या सर्वत्र शारदीय नवरात्रौत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जात आहे. काही ठिकाणी नवरात्रीत देवीसमोर होम हवन केलं जात. अष्टमी आणि नवमीला कोहळ्याचा बळी देऊन देवीला नैव्यद्य दाखवला जातो. देवीच्या समोर कोहळ्याचा बळी का दिला जातो? याबाबत नाशिक येथील धर्म अभ्यासक समीर जोशी यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
कोहळ्यामध्ये दुष्ट शक्तींना सामावून घेण्याची क्षमता असते, अशी मान्यता आहे. हा कोहळा देवीला अर्पण केल्याने वाईट गोष्टींचा नाश होतो. कोहळ्यासारखं फळ किंवा धान्य देवीला नैवेद्य म्हणून अर्पण करण्याच्या क्रियेलाच 'बळी देणे' असं म्हटलं जातं. त्यामुळे अनेक ठिकाणी देवीसमोर कोहळ्याचा बळी दिला जातो.
advertisement
कोहळ्याचा बळी देण्याची कारणे
पूर्वीच्या काळी देवी देवतांना प्राण्यांचा बळी दिला जात असे. ही प्रथा काळाच्या ओघात बदलत गेली. पूर्वीच्या काळी देवी देवतांची पूजा करणाऱ्या सर्व ऋषी-मुनींना सिद्धी प्राप्त झालेली होती. पुजेसाठी बळी दिलेल्या प्राण्यांना ते पुन्हा जिवंत करत होते. परंतु, आता तो काळ राहिलेला नाही. त्यामुळे देवीने केलेल्या मदतीसाठी आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी कोहळ्याचा बळी दिला जातो.
advertisement
देवीने इच्छा पूर्ण केल्यानंतर तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कोहळ्याचा माध्यम म्हणून वापर केला जातो. कोहळ्याचा बळी दिल्याने भक्तांच्या अडचणी कमी होतात, त्यांना समृद्धी आणि शांती मिळते, अशी मान्यता आहे. देवीला बळी देण्यासाठी नारळ, लिंबू, भात, उडीद डाळ यांच्यासुद्धा वापर केला जातो, अशी माहिती समीर जोशी यांनी लोकल 18शी बोलताना दिली.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
September 29, 2025 3:02 PM IST