आकाश कुमार चौधरी कोण?
आकाश कुमारपूर्वीचा रेकॉर्ड इंग्लंडचा वेन व्हाईटच्या नावावर होता, ज्याने 2012 मध्ये लीसेस्टरशायरकडून खेळताना एसेक्सविरुद्ध 12 बॉलमध्ये फिफ्टी मारली होती. आकाशच्या या धमाकेदार बॅटिंगने सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे. पण हा आकाश कुमार चौधरी कोण? ज्याने रेड-बॉल क्रिकेटमधील स्फोटक फलंदाजीची व्याख्या बदलून टाकली.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये डेब्यू
advertisement
आकाश कुमारने 2019 मध्ये त्याच्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली. त्याने मेघालयकडून नागालँडविरुद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याच वर्षी तो सिक्कीमविरुद्ध लिस्ट ए सामने आणि गुजरातविरुद्ध टी-20 सामनेही खेळला. एवढंच नाही तर आकाश मिडियम पेसर बॉलिंग देखील करतो. त्यामुळे आयपीएलमध्ये आकाशवर मोठी बोली लागण्याची शक्यता आहे.
गंभीरला हवा तसा खेळाडू
आकाशच्या कारकिर्दीवर नजर टाकली तर, त्याने एकूण 30 प्रथम श्रेणी सामने, 28 लिस्ट ए सामने आणि 30 टी-20 सामने खेळले आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये, आकाशने 500 हून अधिक धावा केल्या आहेत आणि 78 विकेट्स घेतल्या आहेत. तर आकाशने लिस्ट ए सामन्यांमध्ये 203 धावा केल्या आहेत आणि 37 विकेट्स घेतल्या आहेत, तर टी-20 मध्ये त्याच्या नावावर 28 विकेट्स आहेत. त्यामुळे गंभीरला हवा तसा खेळाडू आयपीएल ऑक्शनमध्ये झळकणार का? असा सवाल विचारला जात आहे.
