TRENDING:

Harshwardhan Sadgir : मातीच नाही मॅटवरही भल्याभल्यांना लोळवतो, शाळेतल्या क्लार्कचा मुलगा कसा झाला डबल महाराष्ट्र केसरी?

Last Updated:

महाराष्ट्र केसरीच्या फायनलमध्ये हर्षवर्धन सदगीर याने महेंद्र गायकवाडचा पराभव केला आहे. हर्षवर्धनचे वडील शाळेत क्लार्क आहेत, कुस्तीसाठी हर्षवर्धनने नाशिक सोडलं आणि तो पुण्यात दाखल झाला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : महाराष्ट्र केसरीच्या फायनलमध्ये हर्षवर्धन सदगीर याने महेंद्र गायकवाडचा पराभव केला आहे. गादी विभागातील विजेता हर्षवर्धन सदगीर आणि माती विभागातील विजेता महेंद्र गायकवाड यांच्यात झालेल्या अटीतटीच्या फायनलमध्ये हर्षवर्धनचा 4-3 ने विजय झाला. पुण्याच्या वाघोली येथे पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या या थरारक फायनलमध्ये प्रेक्षकांनाही श्वास रोखून धरावा लागला. अखेर नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर याने महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावली.
मातीच नाही मॅटवरही भल्याभल्यांना लोळवतो, शाळेतल्या क्लार्कचा मुलगा कसा झाला डबल महाराष्ट्र केसरी?
मातीच नाही मॅटवरही भल्याभल्यांना लोळवतो, शाळेतल्या क्लार्कचा मुलगा कसा झाला डबल महाराष्ट्र केसरी?
advertisement

हर्षवर्धन डबल महाराष्ट्र केसरी

हर्षवर्धन सदगीर हा दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीचा विजेता ठरला आहे. याआधी 2020 साली हर्षवर्धनने पहिल्यांदा मानाची महाराष्ट्र केसरीची गदा जिंकली होती. पुण्याच्या बालेवाडीमध्ये पार पडलेल्या 63 व्या कुस्ती स्पर्धेमध्ये हर्षवर्धन सदगीर याने लातूरच्या शैलेश शेळकेवर याचा 3-2 ने पराभव करून पहिल्यांदाच महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकली होती.

कोण आहे हर्षवर्धन सदगीर?

advertisement

हर्षवर्धन सदगीर हा नाशिकचा पैलवान आहे, त्याचे वडील शाळेमध्ये क्लार्क आहेत. हर्षवर्धनने सुरूवातीला नाशिकच्या बलकवडे आखाड्यात आणि नंतर पुण्यात काका पवारांकडे कुस्तीचे धडे घेतले. काका पवारांचा शिष्य म्हणूनही त्याची ओळख आहे. हर्षवर्धन सदगीरला मॅटवरच्या कुस्तीचाही तगडा अनुभव आहे. आक्रमक खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे.

फायनल जिंकताच हर्षवर्धनची निवृत्ती

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: ऊन तापलं, मार्केट हाललं, लिंबू, केळीच्या आवकेत घट; द्राक्षे, कांद्याला कुठं मिळाला भाव?
सर्व पहा

महाराष्ट्र केसरीची फायनल जिंकताच हर्षवर्धन सदगीरने निवृत्तीची घोषणा केली आहे. 'मी सरकारकडे काम मागायला गेलो, पण मला सरकारने काम दिलं नाही. मी कुस्तीतून निवृत्ती घेत आहे. तुम्ही प्रेम दिलं त्याबद्दल धन्यवाद', असं हर्षवर्धन सदगीर म्हणाला आहे.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Harshwardhan Sadgir : मातीच नाही मॅटवरही भल्याभल्यांना लोळवतो, शाळेतल्या क्लार्कचा मुलगा कसा झाला डबल महाराष्ट्र केसरी?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल