उपकर्णधार म्हणून अक्षर पटेलला पसंती
इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी अक्षर पटेलला उपकर्णधार बनवण्यात आले होते. काही सिलेक्टर्सला असं वाटत होतं की आशिया कपसाठीही अक्षरनेच उपकर्णधार म्हणून कायम राहावं. मात्र, शेवटी शुभमन गिलच्या बाजूने निर्णय घेण्यात आला. शेवटच्या क्षणी मिटिंगमध्ये काय चर्चा झाली की शुभमनच्या गळ्यात व्हाईस कॅप्टन्सीची माळ पडली? पाहा
advertisement
बीसीसीआयच्या बैठकीत काय ठरलं?
निवड समितीमधील सदस्यांनी असा विचार केला की, शुभमन गिल हा असा खेळाडू आहे जो भविष्यात भारतीय संघासाठी दीर्घकाळ नेतृत्व देऊ शकतो. त्यामुळे, त्याच्यावर उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवून भविष्यासाठी गुंतवणूक करणं योग्य ठरेल, असं मत बीसीसीआयच्या बैठकीत मांडण्यात आलं. अखेरीस शुभमनच्या नावावर शिक्कामोर्तब झाला, असं वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिलं आहे.
सूर्यकुमार म्हणतो...
सूर्यकुमार यादवच्या म्हणण्यानुसार शुभमन गिलला पुन्हा उपकर्णधारपद मिळण्याचं कारण म्हणजे पुनरागमन... शुभमन गिलने शेवटचा जो टी२० सामना खेळला होता, त्यात तो उपकर्णधार होता. त्यामुळे, संघात परत आल्यावर त्याला पुन्हा तेच पद देण्यात आलं. गिलने काही काळ कसोटी आणि वनडेवर लक्ष केंद्रित केले होते, पण इंग्लंडमधील कसोटी मालिकेत दमदार कामगिरी केल्यानंतर आता तो पुन्हा टी-20 क्रिकेटकडे वळला आहे, असं सूर्यकुमार म्हणाला.
सूर्यकुमारसाठी धोक्याची घंटा?
दरम्यान, शुभमन गिलला उपकर्णधार करून सूर्याने पायावर धोंडा मारून घेतलाय का? असा सवाल विचारला जात आहे. शुभमनच्या यशाची पायरी सुर्याच्या कॅप्टन्सीवर जाऊ शकते, अशी शक्यता देखील वर्तविली जात आहे.