TRENDING:

T20 World Cup : भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा हायव्होल्टेज सामना, ICC कडून वेळापत्रकाची घोषणा

Last Updated:

भारत पाकिस्तान यांच्यात सामना पार पडणार आहे. या सामन्याच्या वेळापत्रकाची आयसीसीने घोषणा केली आहे.त्यामुळे हा सामना कधी पार पडणार आहे? हे जाणून घेऊयात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
Choose
News18 on Google
advertisement
Womens T20 World Cup 2026 : सध्या सूरू असलेल्या टी20 वर्ल्डकप 2026 मध्ये भारत पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी आमने सामने आले होते. या सामन्यात भारताने 61 धावांनी पाकिस्तानला धुळ चारली होती. त्यानंतर आता पु्न्हा भारत पाकिस्तान सामना होणे अवघड वाटते आहे.असे असतानाच पुन्हा भारत पाकिस्तान यांच्यात सामना पार पडणार आहे. या सामन्याच्या वेळापत्रकाची आयसीसीने घोषणा केली आहे.त्यामुळे हा सामना कधी पार पडणार आहे? हे जाणून घेऊयात.
 india vs pakistan
india vs pakistan
advertisement

टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये भारत पाकिस्तान ग्रुप स्टेजमध्ये समोर आले होते. त्यानंतक आता सूपर 8 चे सामने सूरू आहे. या सूपर 8 मध्ये भारत आणि पाकिस्तान वेगवेगळ्या ग्रुपमध्ये असल्याने त्यांच्यात पुन्हा सामना होण्याची शक्यता कमी आहे. जर दोन्ही संघ सेमी फायनलाला गेले तर भारत पाकिस्तान यांच्यात मॅच होण्याची शक्यता आहे. पण ही शक्यता खूपच कमी आहे.

advertisement

पण असे असताना पुन्हा भारत पाकिस्तान आमने सामने येणार आहेत. यावेळेस मात्र वुमेन्स टी20 वर्ल्डकप 2026 मध्ये हे दोन संघ समोरा समोर येणार आहे. कारण वुमेन्स टी20 वर्ल्डकप 2026 या स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे. या स्पर्धेचे आयोजन इंग्लंडमध्ये करण्यात येणार आहे. आणि या स्पर्धेला 12 जून 2026 पासून सूरूवात होणार आहे. वुमेन्स वर्ल्डकप 2026 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातला महामुकाबला 14 जूनला एजबस्टन खेळवला जाणार आहे. भारताचा हा स्पर्धेतला पहिलाच सामना असणार आहे.

advertisement

टी20 वर्ल्ड कपचा ओपनिंग सामना हा यजमान इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात एजबस्टन बर्मिगहमध्ये खेळवला जाणार आहे. आणि या स्पर्धेतील दोन्ही सेमी फायनल ओव्हलच्या मैदानावर 30 जून आणि 2 जुलैला खेळवला जाणार आहे.तर क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्डसच्या मैदानावर फायनल खेळवली जाणार आहे.

वुमेन्स टी20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत 12 संघांना दोन वेगवेगळ्या ग्रुपमध्ये विभागले जाणार आहे. या ग्रुपमधून टॉप 2 ला राहणारे संघ सेमी फायनलसाठी क्वालिफाय होणार आहे. ग्रुप 1 मध्ये भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया,  साऊथ आफ्रिका, बांग्लादेश आणि नेदरलँड ग्रुप 2 मध्ये इंग्लंड, श्रीलंका, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, आयर्लंड आणि स्कॉटलँड

advertisement

ग्रुप 1 : भारत, पाकिस्तान,ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिका, बांग्लादेश आणि नेदरलँड.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
ग्रामीण भागातील पारंपरिक पदार्थ, सोप्या पद्धतीने बनवा गोड सांदणे, रेसिपीचा Video
सर्व पहा

ग्रुप 2 : इंग्लंड, श्रीलंका, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, आयर्लंड आणि स्कॉटलँड

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 World Cup : भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा हायव्होल्टेज सामना, ICC कडून वेळापत्रकाची घोषणा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल