योगराज सिंग काय म्हणाले?
ज्या माणसाविषयी अनेक लोक चुकीचे बोलतात तो म्हणजे रोहित शर्मा... मी त्याच दिवशी म्हटलं होतं की, रोहित माझा खेळाडू आहे. ज्या प्रकारे त्याने फलंदाजी केली, ती एका बाजूला आणि बाकी संघाची फलंदाजी दुसऱ्या बाजूला... त्याची एक इनिंग आणि बाकी जगाच्या इनिंग्ज एका बाजूला... हा त्याचा क्लास आहे, असं म्हणत योगराज सिंग यांनी News18 CricketNext शी बोलताना रोहितचं कौतुक केलं.
advertisement
"रोहितमध्ये 45 व्या वर्षापर्यंत खेळण्याची क्षमता"
तुम्ही रोहितला म्हणा की, आम्हाला तुझी अजून 5 वर्षे गरज आहे. त्यामुळे देशासाठी अधिक खेळा, फिटनेसवर काम कर. त्याच्या मागे 4 माणसे लावा आणि त्याला रोज 10 किलोमीटर धावायला लावा. जर त्याची इच्छा असेल तर त्याच्यात 45 व्या वर्षापर्यंत खेळण्याची क्षमता आहे, असंही योगराज सिंग यांनी म्हटलं आहे.
तुम्हाला लाज वाटत नाही का? - योगराज सिंग
रोहित शर्माने डोमेस्टिक क्रिकेट खेळलं पाहिजे. त्यामुळे तो आणखी फिट होईल. फायनलमध्ये ‘सामनावीर’ (Man of the Match) कोण ठरला? रोहित शर्मा... त्यामुळे तुम्ही त्याच गोष्टींविषयी बोला, ज्या तुम्हाला माहिती आहेत. जर तुम्हाला त्याच्या खेळाबद्दल आणि फिटनेसविषयी बोलायचे असेल, तर तुम्ही कोणत्यातरी पातळीवर क्रिकेट खेळलेले असावे. अशा प्रकारे बोलताना तुम्हाला लाज वाटत नाही का? असा खडा सवाल देखील योगराज सिंग यांनी विचारला आहे.
2027 चा वर्ल्ड कप खेळणार?
दरम्यान, रोहितची पुढील आंतरराष्ट्रीय मॅच नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तीन एकदिवसीय सामन्यांची असेल. बीसीसीआय रोहितची संघातील भूमिका आणि 2027 च्या वर्ल्ड कपमध्ये (World Cup) तो संघाचे नेतृत्व करण्यासाठी योग्य आहे की नाही, हे ठरवण्यासाठी हा दौरा महत्त्वाचा ठरू शकतो.
