टी-ट्वेंटी फॉरमॅटमध्ये सर्वात चांगली टीम
युवराजच्या वाढदिवसाला बीसीसीआयने त्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. टीम इंडियाच्या पोरांना भेटून आणि बोलून बरं वाटलं, असं युवी म्हणाला. विरोधी संघ देखील देखील तगडा आहे. हडलमध्ये बोलल्याने पोरांची स्पुर्ती वाढते. त्यांचा खेळण्याचा उत्साह वाढतो. मागील काही वर्षात खेळाडूंच्या प्रगतीचा अभिमान वाटतो. जेव्हा टी-ट्वेंटी फॉरमॅटचा विषय येतो आणि वनडे फॉरमॅटबद्दल विचार करतो, तेव्हा आपण जगातील सर्वात चांगली टीम आहोत, असं युवराज सिंग म्हणाला.
advertisement
मी टीम जिंकू किंवा हारू, मला...
आता थोड्या दिवसात टी-ट्वेंटी वर्ल्ड कप येतोय. मी सध्या टीमचा प्रॅक्टिस बघतोय. त्यामुळे मला थोडाही डाऊट नाहीये की, टीम इंडिया नक्कीच सेमीफायनल आणि फायनलमध्ये असेल, असा विश्वास देखील युवराज सिंगने व्यक्त केलाय अन् टीम इंडिया फायनल खेळेल अशी मोठी भविष्यवाणी युवीने केली. मी टीम जिंकू किंवा हारू, मला नेहमी संघाचा अभिमान असेल, असं देखील सिक्सर किंग म्हणाला.
टीम म्हणून खेळला तर...
दरम्यान, मी देखील अशा टीमचा भाग होतो, जेव्हा आम्ही खूप सामने गमावले आणि खूप महत्त्वाचे सामने जिंकवले. त्यामुळे जर तुम्ही एक टीम म्हणून खेळला तर निकाल नक्कीच तुमच्या हाती लागेल, असं म्हणत युवराज सिंगने टीम इंडियाला टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी विजयाचा मंत्र दिलाय.
