सिकंदर रझाच्या खांद्यावर नेतृत्वाची जबाबदारी
झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाने सिकंदर रझा याच्या खांद्यावर नेतृत्वाची जबाबदारी सोपवली आहे. या संघात ब्लेसिंग मुजरबानी याचे पुनरागमन झाले असून तो रिचर्ड नगारवा याच्यासोबत वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळेल. बॉलर्सचा ताफा मजबूत करण्यासाठी ब्रॅडली इवांस आणि टिनोटेंडा मापोसा हे वेगवान गोलंदाज देखील ताफ्यात असतील. क्रेमर आणि वेलिंग्टन मसाकाद्जा या अनुभवी जोडीवर विश्वास दाखवण्यात आला आहे. सिकंदर रझा मॅच खेळणार की नाही? याची 24 तास आधी शंका होती. मात्र, त्याला कॅप्टन्सी सोपवण्यात आली आहे.
advertisement
ऑलराऊंडर खेळाडूचा समावेश
ब्रेंडन टेलरचा अनुभव टॉप ऑर्डरमध्ये संघासाठी मोलाचा ठरेल. रयान बर्ल हा ऑलराऊंडर खेळाडू आपल्या आक्रमक फलंदाजीने संघाला संतुलन देणार आहे. झिम्बाब्वेचा समावेश ग्रुप बी मध्ये करण्यात आला असून त्यांना ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, आयर्लंड आणि ओमान यांसारख्या आव्हानात्मक संघांशी दोन हात करावे लागतील. या गटातील टॉप 2 संघ सुपर 8 फेरीसाठी पात्र ठरतील.
झिम्बाब्वेचे सामने कधी?
झिम्बाब्वे आपल्या मोहिमेची सुरुवात 9 फेब्रुवारी रोजी ओमानविरुद्ध कोलंबो येथे करेल. त्यानंतर 13 फेब्रुवारीला ऑस्ट्रेलिया, 17 फेब्रुवारीला आयर्लंड आणि 19 फेब्रुवारीला यजमान श्रीलंकेविरुद्ध त्यांचे सामने होतील.
टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी झिम्बाब्वे टीम : सिकंदर रझा (कर्णधार), ब्रायन बेनेट, रायन बर्ल, ग्रीम क्रेमर, ब्रॅडली इव्हान्स, क्लाइव्ह मदांडे, टिनोटेंडा मापोसा, तादिवानाशे मारुमणी, वेलिंग्टन मसाकादझा, टोनी मुन्योंगा, ताशिंगा मुसेकिवा, ब्लेसिंग मुझाराबानी, डायन मायर्स, रिचर्ड नगारावा आणि ब्रेंडन टेलर.
