अलका गुजनाळ यांनी सांगितले की, त्यांचे बालपण बुधवार पेठ परिसरात गेले असल्यामुळे वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना रोजच्या आयुष्यात कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते याची त्यांना जाणीव होती. आरोग्याच्या समस्या, सामाजिक तिरस्कार, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आणि पर्याय नसल्यामुळे सुरू असलेला व्यवसाय या सगळ्या अडचणी त्यांना माहीत होत्या. या जाणिवेतून त्यांनी या महिलांसाठी काम करण्याचा निर्णय घेतला आणि अलका फाउंडेशनची स्थापना केली.
advertisement
नोकरी सोडली, पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुरू केला वडापाव व्यवसाय, महिन्याला तब्बल 3 लाख कमाई
या फाऊंडेशनच्या माध्यमातून बुधवार पेठेतील महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिरे, मुलांच्या शिक्षणासाठी मदत, तसेच महिलांना स्वतःचा व्यवसाय उभा करता यावा म्हणून प्रशिक्षण आणि मार्गदर्शन दिले जाते. या सर्व उपक्रमांमुळे अनेक मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न सुटला आहे, तसेच अनेक महिला स्वतःचा छोटा-मोठा व्यवसाय करत आहेत.
इतर वंचित घटकांसाठी देखील मदतीचा हात
अलका फाऊंडेशन समाजातील इतर वंचित घटकांसाठी देखील मोठ्या प्रमाणावर काम करत आहे. यामध्ये अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात, जसे की दिव्यांग आणि एच.आय.व्ही बाधितांसाठी मदत करणे. त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी प्रशिक्षण व मार्गदर्शन दिले जाते. तसेच निराधार आणि विधवा महिलांसाठी काम केले जाते. वेश्या व्यवसाय करणाऱ्या मुलांचे पालन-पोषण करण्यासह अनेक उपक्रमांमध्ये फाऊंडेशन सक्रिय आहे.





