advertisement

वडील पुणे मनपात अधिकारी; लेक कॉलेजसमोर कारमध्येच पँट काढायचा अन्..., तरुणींच्या तक्रारीनंतर खळबळ, प्रणवला अटक

Last Updated:

आरोपी प्रणव हा वारंवार आपल्या कारमधून महाविद्यालयाच्या आवारात यायचा. गाडीत बसून तो अत्यंत अश्लील कृत्य करत असे. पँट गुडघ्यापर्यंत खाली करून आणि समोर मोबाईल धरून तो तिथून जाणाऱ्या विद्यार्थिनींकडे बघून अश्लील चाळे करायचा.

कारमध्ये अश्लील कृत्य (प्रतिकात्मक फोटो)
कारमध्ये अश्लील कृत्य (प्रतिकात्मक फोटो)
पुणे : शिवाजीनगर परिसरातील एका नामांकित महाविद्यालयाबाहेर कारमध्ये बसून विद्यार्थिनींकडे पाहून अश्लील चाळे करणाऱ्या तरुणाला शिवाजीनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी प्रणव केदार वझे (वय २२) असे या तरुणाचे नाव असून, तो पुणे महानगरपालिकेतील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याचा मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून, विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, ४ मार्च रोजी दुपारी १२.४५ च्या सुमारास ही घटना घडली. आरोपी प्रणव हा वारंवार आपल्या कारमधून महाविद्यालयाच्या आवारात यायचा. गाडीत बसून तो अत्यंत अश्लील कृत्य करत असे. पँट गुडघ्यापर्यंत खाली करून आणि समोर मोबाईल धरून तो तिथून जाणाऱ्या विद्यार्थिनींकडे बघून अश्लील चाळे करायचा.
नगरसेविकेच्या तक्रारीनंतर कारवाई
हा प्रकार पाहून स्थानिक नागरिक आणि विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. दरम्यान, भाजपच्या एका महिला नगरसेविकेला या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. नगरसेविकेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत प्रणव वझे याला अटक केली.
advertisement
पालकांमध्ये संतापाची लाट
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणव वझे याने अशा प्रकारचे कृत्य करण्याची ही दुसरी वेळ आहे. तो वारंवार अशा प्रकारे विद्यार्थिनींची छेड काढत असे. या घटनेनंतर महाविद्यालयातील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमध्ये प्रचंड संताप दिसून येत आहे. "मुलावर कठोर कारवाई व्हावी," अशी मागणी पालकांकडून करण्यात येत असून, महाविद्यालयाच्या परिसरात पोलिसांची गस्त वाढवण्याची गरज व्यक्त केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
वडील पुणे मनपात अधिकारी; लेक कॉलेजसमोर कारमध्येच पँट काढायचा अन्..., तरुणींच्या तक्रारीनंतर खळबळ, प्रणवला अटक
Next Article
advertisement
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement