advertisement

मुंबईकर पाणी जपून वापरा! ऐन उन्हाळ्यात पुरवठा बंद राहणार, कधी आणि कुठं? पाहा सविस्तर

Last Updated:

Mumbai Water: मुंबईकरांना मार्च महिन्यातच पाणी जपून वापरावं लागेल. पुढील आठवड्यात काही भागात पाणीपुरवठा बंद राहील.

Mumbai Water Cut:मुंबईकर पाणी जपून वापरा! ऐन उन्हाळ्यात पुरवठा बंद राहणार, कधी आणि कुठं? पाहा सविस्तर
Mumbai Water Cut:मुंबईकर पाणी जपून वापरा! ऐन उन्हाळ्यात पुरवठा बंद राहणार, कधी आणि कुठं? पाहा सविस्तर
मुंबई: मुंबईसह उपनगरांत ऊन चांगलंच तापलं असून गेल्या काही दिवसांत उष्ण आणि दमट हवामानाचा यलो अलर्ट आहे. अशातच आता मुंबईकरांना पाणी जपून वापरावं लागणार आहे. पुढील आठवड्यात मुंबईच्या ‘पी पूर्व’ आणि ‘पी दक्षिण’च्या काही भागांत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर दुसऱ्या दिवशी पाणीपुरवठा कमी दाबाने होईल, अशी महापालिकेने दिली आहे.
गोरेगाव पूर्वेतील फिल्म सिटी मार्गावरील उड्डाणपुलाच्या पोहोच रस्त्याजवळ 750 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी आहे. या वळविलेल्या जलवाहिनीच्या छेद जोडणीचे काम मंगळवारी, 10 मार्चला सकाळी 9 ते बुधवारी, 11 मार्चला सकाळी 9 या वेळेत करण्यात येणार आहे. त्यामुळे 'पी पूर्व' आणि 'पी दक्षिण'च्या काही भागांत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील.
advertisement
या भागात पाणीपुरवठा बंद
'पी पूर्व' विभागातील शिवशाही प्रकल्प, श्रीकृष्ण नगर आणि इंदिरा गांधी संशोधन संस्था परिसरात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील. तर पी दक्षिण' विभागातील सॅटेलाईट टॉवर, संतोषनगर, माळीनगर, हबळे पाडा, उमरशेट पाडा, नगरमोडे पाडा, सुनील मैदान तसेच फिल्म सिटी मार्गालगतच्या भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
या भागात कमी दाबाने पुरवठा
10 मार्च रोजी मोहन गोखले मार्ग, कृष्णा वाटिका मार्ग, साई मार्ग आणि आर्य भास्कर मार्ग या भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरावं लागेल. तसेच गैरसोय टाळण्यासाठी पाण्याचा पुरेसा साठा आणि काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
मुंबईकर पाणी जपून वापरा! ऐन उन्हाळ्यात पुरवठा बंद राहणार, कधी आणि कुठं? पाहा सविस्तर
Next Article
advertisement
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement