advertisement

नाशिकमध्ये खळबळ! प्रसिद्ध महिला डॉक्टर मनीषा जेजुरकरांनी संपवलं जीवन, नक्की काय घडलं?

Last Updated:

Nashik News: नाशिक शहरातून मन सुन्न करणारी बातमी समोर आली आहे. शहरातील प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर यांनी आपल्या राहत्या घरात जीवन संपवलं आहे.

News18
News18
लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी नाशिक: नाशिक शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी बातमी समोर आली आहे. शहरातील प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे नाशिकच्या वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. मनीषा जेजुरकर या नाशिकमधील गंगापूर रोड सारख्या उच्चभ्रू परिसरात वास्तव्यास होत्या. शुक्रवारी त्यांनी आपल्या राहत्या घरात नायलॉनच्या दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. डॉ. मनीषा या नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयातील नामांकित मनोविकारतज्ज्ञ डॉ. नीलेश जेजुरकर यांच्या पत्नी होत्या.

वैद्यकीय क्षेत्रात शोककळा

डॉ. मनीषा जेजुरकर या स्वतः एक उत्तम आयुर्वेद तज्ज्ञ म्हणून परिचित होत्या. त्यांचे पती डॉ. नीलेश जेजुरकर हे जिल्हा रुग्णालयात मनोविकारतज्ज्ञ म्हणून कार्यरत असून, ते अनेकांचे मानसिक आरोग्य सावरण्याचे काम करतात. अशा परिस्थितीत त्यांच्याच पत्नीने इतके टोकाचे पाऊल उचलल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
advertisement

आत्महत्येचं कारण अस्पष्ट

डॉ. मनीषा यांनी आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट सापडली आहे की नाही, याबाबत पोलिसांनी अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही. गंगापूर रोड पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
मनीषा यांच्या आत्महत्येमागे कौटुंबीक कारण आहे की त्या स्वतः काही मानसिक दडपणाखाली होत्या, याचा तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी परिसरातील नागरिक आणि नातेवाईकांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली आहे. एका प्रसिद्ध महिला डॉक्टरने अशाप्रकारे जीवन संपवल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
नाशिकमध्ये खळबळ! प्रसिद्ध महिला डॉक्टर मनीषा जेजुरकरांनी संपवलं जीवन, नक्की काय घडलं?
Next Article
advertisement
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement