नाशिकला हादरे 4 दिवसांत दुसऱ्यांदा भूकंप! जमिनीतून गूढ आवाज अन् भांड्यांचाही खणखणाट
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात उंबरठाण आणि परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत आहेत. जमिनीतून येणाऱ्या आवाजांमुळे नागरिक भयभीत आहेत. ग्रामस्थांनी प्रशासनाकडे भूकंपमापन यंत्र बसवण्याची मागणी केली आहे.
लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी नाशिक: एकीकडे उन्हाचा चटका वाढत असल्याने घरात राहायला गेलं तर अजब घडत आहे. त्यामुळे नाशिकचे लोक धास्तावले आहेत. नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात निसर्गाने वेगळंच संकट उभं केलंय. गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरगाणा तालुक्यातील उंबरठाण आणि परिसरात भूकंपाच्या सौम्य धक्क्यांची मालिका सुरू आहे. जमिनीतून येणाऱ्या आवाजांमुळे नागरिकांची झोप उडाली आहे.जमीन हादरतेय आणि काळजात धस्स होतंय, अशी भीती स्थानिक व्यक्त करत आहेत.
काय घडलं नेमकं?
सुरगाण्यातील उंबरठाण, निवरापाडा, चुली, राशा आणि गोंडाळविहीर या भागात भूकंपाचे धक्के सातत्याने जाणवत आहेत. ५ मार्चच्या रात्री ११:५२ वाजता जेव्हा सगळं जग झोपलेलं होतं, तेव्हा अचानक जमिनीतून मोठा आवाज आला. घरावरील पत्रे हलू लागले आणि स्वयंपाकघरातील भांडी खाली पडली. हा थरार इथेच थांबला नाही, तर ६ मार्चच्या सकाळी १०:०५ वाजता पुन्हा एकदा जमीन हादरल्याने नागरिकांनी घराबाहेर पळ काढला.
advertisement
जमिनीतून गूढ आवाज, भांडी वाजतात
राशा गावाजवळील डोंगराळ भागातून विचित्र आवाज येत असून त्यानंतर जमीन १ ते २ सेकंद हादरत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. काही ठिकाणी घरांच्या भिंतींना तडे गेल्याच्याही चर्चा आहेत. या सततच्या धक्क्यांमुळे लहान मुलं आणि वृद्धांमध्ये प्रचंड भीती पसरली आहे. वारंवार होणाऱ्या या धक्क्यांमुळे संपूर्ण तालुक्यात तणावाचे वातावरण आहे. "प्रशासनाने आता तरी जागं व्हावं आणि या भागात तातडीने 'भूकंपमापन यंत्र' बसवावं," अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Mar 07, 2026 8:36 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
नाशिकला हादरे 4 दिवसांत दुसऱ्यांदा भूकंप! जमिनीतून गूढ आवाज अन् भांड्यांचाही खणखणाट









