सावित्रीची लेक! पुण्यातील बुधवार पेठेतला ‘तो’ निर्णय, अनेक महिलांचं आयुष्यच बदललं, Video
- Reported by:Pooja Satyavan Patil
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Pune News: पुण्यातील अलका गुजनाळ समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी काम करत आहेत. विशेषत: बुधवार पेठेतील महिलांसाठी त्या कार्यरत आहेत.
पुणे : मुलींच्या शिक्षणासाठी आयुष्य वाहणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज 195 वी जयंती देशभरात साजरी केली जात आहे. त्यांच्या विचारांवर चालत पुण्यातील अलका गुजनाळ समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी काम करत आहेत. विशेषत: बुधवार पेठेतील वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी त्या काम करत आहेत. या महिलांचे आरोग्य, त्यांच्या मुलांचे शिक्षण आणि स्वावलंबनासाठी छोट्या व्यवसायांची मदत अलका गुजनाळ करत आहेत. त्यांच्या या कार्याविषयी त्यांनी लोकल 18 ला माहिती दिली आहे.
अलका गुजनाळ यांनी सांगितले की, त्यांचे बालपण बुधवार पेठ परिसरात गेले असल्यामुळे वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना रोजच्या आयुष्यात कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते याची त्यांना जाणीव होती. आरोग्याच्या समस्या, सामाजिक तिरस्कार, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आणि पर्याय नसल्यामुळे सुरू असलेला व्यवसाय या सगळ्या अडचणी त्यांना माहीत होत्या. या जाणिवेतून त्यांनी या महिलांसाठी काम करण्याचा निर्णय घेतला आणि अलका फाउंडेशनची स्थापना केली.
advertisement
या फाऊंडेशनच्या माध्यमातून बुधवार पेठेतील महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिरे, मुलांच्या शिक्षणासाठी मदत, तसेच महिलांना स्वतःचा व्यवसाय उभा करता यावा म्हणून प्रशिक्षण आणि मार्गदर्शन दिले जाते. या सर्व उपक्रमांमुळे अनेक मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न सुटला आहे, तसेच अनेक महिला स्वतःचा छोटा-मोठा व्यवसाय करत आहेत.
advertisement
इतर वंचित घटकांसाठी देखील मदतीचा हात
view commentsअलका फाऊंडेशन समाजातील इतर वंचित घटकांसाठी देखील मोठ्या प्रमाणावर काम करत आहे. यामध्ये अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात, जसे की दिव्यांग आणि एच.आय.व्ही बाधितांसाठी मदत करणे. त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी प्रशिक्षण व मार्गदर्शन दिले जाते. तसेच निराधार आणि विधवा महिलांसाठी काम केले जाते. वेश्या व्यवसाय करणाऱ्या मुलांचे पालन-पोषण करण्यासह अनेक उपक्रमांमध्ये फाऊंडेशन सक्रिय आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 03, 2026 10:08 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
सावित्रीची लेक! पुण्यातील बुधवार पेठेतला ‘तो’ निर्णय, अनेक महिलांचं आयुष्यच बदललं, Video









