यानंतर, त्याने सैन्य आणि पोलीस दलात भरती होण्याचा प्रयत्न केला. दोनदा तो सैन्य दलाच्या मेडिकलमध्ये नापास झाला आणि सुमारे सहा महिन्यांपूर्वी तो पोलीस भरतीची परीक्षाही पास करू शकला नाही. याच काळात त्याने पाहिलं की, त्याचे वडील शेतीतून चांगला नफा मिळवत आहेत, त्यामुळे त्यानेही शेती करायला सुरुवात केली.
शेतीतच दिसलं भविष्य!
advertisement
विपिन सांगतो की, त्याला अभ्यासात कधीच रस नव्हता. त्याला नेहमी वाटायचं की, आपण स्वतःचं काहीतरी करावं. जेव्हा त्याला नोकरी मिळाली नाही, तेव्हा त्याने आपलं लक्ष शेतीवर केंद्रित केलं. दोन वर्षांपूर्वी त्याने आपलं शिक्षण सोडून पूर्णपणे शेतीकडे वळला. आज विपिन शेती करतोय. यामध्ये तो हिरवी मिरची, टोमॅटो, कोथिंबीर आणि पुदिना यांची लागवड करतो. विशेष म्हणजे या सर्व पिकांना बाजारात चांगला भाव मिळतो. विपिन म्हणतो की, योग्य पद्धतीने, कष्ट आणि नियोजनाने शेती केली, तर लाखोंची कमाई करता येते.
वार्षिक 25 लाखांची कमाई!
विपिन सध्या शेतीतून वर्षाला सुमारे 25 लाख रुपये कमावतोय. त्याला मिरची आणि पुदिन्यापासून सर्वाधिक नफा मिळतो. कोथिंबीर आणि टोमॅटोच्या लागवडीतूनही त्याला चांगला फायदा होतो. विपिन म्हणतो की, आता तो शेतीलाच आपलं भविष्य मानतो. शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञान आणून अधिक उत्पादन घेण्याचं त्याचं स्वप्न आहे.
हे ही वाचा : Agriculture Success Story : आईच्या हस्ते लागवड, 3 एकरात फुलवली आंब्याची बाग, शेतकरी कमवतोय लाखात पैसा!
हे ही वाचा : लागवड सोपी, खर्च कमी अन् कमाई जास्त! 'या' एका पिकामुळे शेतकरी झाला मालामाल, इतकंच नाहीतर...