शेतामध्ये भेंडी, टोमॅटो, वांगे, काकडी यांसह विविध पालेभाज्यांचे उत्पादन अशोक आढाव घेत असतात. त्यामुळे असाच आगळावेगळा प्रयोग करायचा म्हणून त्यांनी गेल्या दोन महिन्यांपूर्वी दहा गुंठे क्षेत्रात पालेभाज्यांमधील दोडके या भाजीची लागवड केली. पाच बाय पाच वर दोडक्याची लागवड करण्यात आली, तसेच पाण्याची व्यवस्थापन म्हणून ठिबक सिंचनाचा वापर देखील या ठिकाणी केला जातो. याबरोबरच 10-26-26 या खताचा डोस या झाडांना देण्यात येतो. तसेच झाडे टिकून राहावे म्हणून बुरशीनाशक या औषधाची फवारणी देखील पिकांवर केली जाते.
advertisement
विशेषतः झाड खाली जमिनीवर येऊ नये म्हणून बांबूंचा देखील वापर या ठिकाणी करण्यात आला आहे. आतापर्यंत या दोडका पिकातून चाळीस हजार रुपयांचे उत्पन्न निघाल्याचे सांगितले जाते. तरुणांसह इतर शेतकऱ्यांनी देखील दोडका शेती नक्कीच करायला हवी, कारण की दररोज या शेतीतून पैसे मिळतात. जसं पीक विक्री होईल त्या पद्धतीने दररोज 3000, ते 4000 हजार रुपये कमाई होते. विशेषतः चांगले उत्पादन घेण्यासाठी औषध फवारणीची काळजी घेणे आवश्यक आहे, तरुणांनी या शेतीत मेहनत घेतल्यास नक्कीच यातून चांगली उत्पन्न मिळवता येईल.