TRENDING:

गावासाठी आदर्श! पतीच्या मृत्यूनंतर रूबीने दाखवली हिंमत, जिद्दीने केली शेती, वर्षाला कमवते 'इतके' लाख

Last Updated:

रूबी यांचे पती 13 वर्षांपूर्वी निधन पावले. तेव्हा आयुष्यात अडचणींचं वादळ आलं. मात्र हार न मानता, त्यांनी शेतीचा मार्ग निवडला. स्थानिक कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
इच्छाशक्ती, जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी असेल, तर कोणतंही काम अशक्य नाही. नव्याने काही गोष्टी शिकत पुढे प्रवास केला की, तुमच्या मेहनतीला फळ मिळतंच. असंच एक प्रेरणादायी उदाहरण रुबीदेवी यांच्या जगण्याचं देता येईल. बिहारमधील शिवहर जिल्ह्यातील धनकौल बलहा गावात राहणारी रूबी आजूबाजूच्या सगळ्यांसाठी एक उदाहरण बनली आहे. सुमारे 13 वर्षांपूर्वी तिच्या नवऱ्याचं निधन झाल्यावर तिच्या आयुष्यात अचानक खूप संकटं आली. मुलांना वाढवणं, पैशांची तंगी आणि समाजाचा दबाव, अशा चहुबाजूंनी अडचणी होत्या. पण परिस्थितीपुढे हार मानण्याऐवजी रूबीने आपल्या आयुष्याला नवी दिशा देण्याचा निर्णय घेतला.
Bihar woman farmer
Bihar woman farmer
advertisement

अनुभवी शेतकऱ्यांकडून शिकून घेतलं

तिने अनुभवी शेतकऱ्यांचा सल्ला घेतला आणि नवऱ्याच्या वाटणीची जमीन आपली ताकद बनवून शेतीत उतरली. सुरुवातीला साधनसामग्री आणि अनुभवाची कमी तिला जाणवली, पण हळू हळू तिने स्थानिक कृषी अधिकाऱ्यांकडून आणि अनुभवी शेतकऱ्यांकडून मार्गदर्शन घेऊन सगळं शिकून घेतलं.

शेतीतून होतेय 5 लाखांची कमाई

रूबी गेल्या 12 वर्षांपासून हिरव्या भाज्यांची शेती करत आहे आणि आता तिचं वार्षिक उत्पन्न सुमारे 5 लाख रुपयांपर्यंत पोहोचलं आहे. तिच्या शेतात कोबी, टोमॅटो, वाटाणा, भेंडी, वांगी, कारले आणि ढोबळी मिरचीसारख्या अनेक प्रकारच्या मौसमी भाज्या पिकतात. इतर महिलांसाठीही प्रेरणास्रोत ठरलेली रूबी सध्या तिच्या शेतात वांगी, भेंडी आणि लसूणची लागवड करत आहे, तर कोबी आणि परवळची पीक तयार व्हायच्या मार्गावर आहे.

advertisement

संपूर्ण गावासाठी झाली आदर्श उदाहरण

ॉरूबी केवळ तिच्या कुटुंबाची चांगली काळजी घेत नाही, तर गावातील इतर महिलांसाठीही ती प्रेरणास्रोत बनली आहे. तिच्या यशाने हे सिद्ध होतं की, जर हिंमत आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी असेल, तर कोणतीही अडचण माणसाला थांबवू शकत नाही. आज रूबी स्वावलंबन आणि आत्मसन्मानाचं एक मजबूत प्रतीक बनली आहे.

advertisement

हे ही वाचा : शेवग्याच्या पानातून समृद्धी! सादिकानं बदलली गावाची आणि स्वतःची लाईफ, महिना कमवते 1 लाख

हे ही वाचा : शेतजमीन नाही? हरकत नाही! आता सिमेंटच्या घरात पिकवा भाजीपाला; फक्त 100 रुपयात सुरू कराल बागकाम!

मराठी बातम्या/Success Story/
गावासाठी आदर्श! पतीच्या मृत्यूनंतर रूबीने दाखवली हिंमत, जिद्दीने केली शेती, वर्षाला कमवते 'इतके' लाख
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल