कॉर्पोरेट जगतातून स्पर्धा परीक्षेपर्यंतचा प्रवास
शालेय जीवनापासूनच हुशार असलेल्या दिव्या यांनी त्यांच्या आयुष्याच्या आणि संघर्षाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांचा बॉयफ्रेंड आणि आता पती आदित्य तिवारी यांची साथ मिळाली. या दोघांच्या सहकार्याने दिव्या यांनी केवळ प्रेमच नाही, तर सिव्हिल सेवेतील एक महत्त्वाचे स्थानही मिळवले. मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी पूर्ण केल्यानंतर दिव्या यांना एका नामांकित कंपनीत उत्तम नोकरी मिळाली होती. पण त्यांचे मन शासकीय सेवेत रुजू होण्यासाठी धडपडत होत्या. त्यामुळे त्यांनी कॉर्पोरेट नोकरीचा सोडून, सरकारी नोकरीच्या तयारीचा खडतर मार्ग निवडला. इंजिनीअरिंगची पार्श्वभूमी असल्यामुळे हा बदल त्यांच्यासाठी मोठा होता. पण, याच काळात त्यांनी जिद्दीने अभ्यास सुरू केला.
advertisement
पहिल्या प्रयत्नात अडथळे, तरीही हार मानली नाही
तयारीला योग्य दिशा देण्यासाठी त्यांनी इंदूर गाठले, जे स्पर्धा परीक्षेचे केंद्र मानले जाते. दिव्या यांनी सर्वप्रथम MPPSC चा संपूर्ण अभ्यासक्रम समजून घेतला आणि 'शून्य' पासून सुरुवात करून प्रत्येक अपयशाला एक शिकण्याची संधी मानले. 2018 मध्ये दिव्या यांनी पहिल्यांदा MPPSC परीक्षा दिली. त्यामध्ये त्या प्रीलिम्स मध्ये यशस्वी झाल्या, पण काही कौटुंबिक समस्यांमुळे त्या मेन्स परीक्षेला बसू शकल्या नाहीत. हा त्यांचा पहिला मोठा अनुभव होता.
'डीएसपी' पतीची 'गुरु' म्हणून साथ
2019 मध्ये त्यांनी पुन्हा पूर्ण ताकदीने तयारी केली आणि या वेळी त्यांनी प्रीलिम्स आणि मेन्स दोन्ही टप्प्यांवर चमकदार कामगिरी केली. दुर्दैवाने, सरकारी परीक्षेच्या निकालावर तात्पुरती बंदी आल्यामुळे त्यांच्या मेहनतीचे फळ लगेच मिळाले नाही. मात्र, या विलंबाने त्यांचा आत्मविश्वास डगमगला नाही. दिव्या यांच्या यशातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे त्यांचे जीवनसाथी आदित्य तिवारी (जे स्वतः डीएसपी आहेत) यांची साथ. शालेय जीवनापासूनची त्यांची मैत्री तयारीच्या काळात अधिक मजबूत झाली. आदित्य यांनी केवळ जोडीदार म्हणून नव्हे, तर मार्गदर्शक (Mentor) म्हणूनही दिव्या यांना खूप मदत केली.
दिव्या यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, आदित्य यांनी माझ्यासाठी अभ्यासाचे वेळापत्रक बनवले आणि प्रत्येक कठीण परिस्थितीत मला प्रोत्साहन दिले. त्यांचे मार्गदर्शन माझ्यासाठी मोलाचं ठरलं. या अतूट साथीमुळेच, 2020 मध्ये दिव्या यांच्या मेहनतीला यश मिळाले आणि त्यांची निवड कमर्शियल टॅक्स इन्स्पेक्टर पदावर झाली. आणि मग, जेव्हा MPPSC 2019 चा थांबलेला निकाल जाहीर झाला, तेव्हा दिव्या झरिया यांचे नाव थेट डीएसपी (DSP) पदाच्या गुणवत्ता यादीत नावही आलं.
दिव्या यांच्या यशाचे 'तीन मंत्र'
स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी योग्य रणनीती खूप आवश्यक आहे, असे दिव्या झरिया ठामपणे सांगतात. त्यांच्या मते, यश मिळवण्यासाठी खालील तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कोणताही भाग न सोडता पूर्ण अभ्यास करणे. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर वारंवार रिव्हिजनवर लक्ष केंद्रित करणे. विशेषतः मेन्स परीक्षेसाठी दर्जेदार आणि नेमक्या अभ्यासाच्या सामग्रीवर भर देणे. दिव्या झरिया यांची ही गोष्ट सिद्ध करते की, जेव्हा आत्मविश्वास, कठोर परिश्रम आणि योग्य जोडीदाराचा पाठिंबा एकत्र येतो, तेव्हा कोणतेही ध्येय गाठणे अशक्य नसते. त्यांचे यश अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरेल.
