बी.टेकची पदवी घेऊन बंगळूरमध्ये गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडली आणि गावी परत येऊन शेतीत लक्ष केंद्रित केलं, तर काय होतं, याचं उत्तम उदाहरण हा तरुण शेतकरी आहे. त्याने हे दाखवून दिलं की शेतीतूनही सोनं उगवू शकतं, पैसे मिळू शकतात. कृषी तज्ज्ञ सुभाष पाळेकर यांचा सल्ला घेऊन शेती सुरू केलेल्या या तरुणाने आता लाखोंचा नफा मिळवून इतर शेतकऱ्यांसाठी एक नवीन आदर्श उभा केला. उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील या तरुण शेतकऱ्याची ही संघर्षगाथा प्रेरणादायी आहे.
advertisement
बंगळूरची नोकरी सोडली आणि गावात परतला
बलिया जिल्ह्यातील बसंतपूर गावातील रहिवासी असलेल्या दुष्यंत कुमार सिंह यांनी २०१७ मध्ये बी.टेक. पूर्ण केले. त्यानंतर बंगळूरमध्ये एका खासगी कंपनीत त्यांनी वर्षभर नोकरी केली. मात्र, या नोकरीत त्यांचे मन रमलं नाही. शेवटी, शहराच्या धावपळीतून बाहेर पडायचं असं त्याने मनाशी पक्क केलं आणि त्याने नोकरी सोडली. आपल्या गावी परत येऊन शेतीत काम करण्याचा निर्णय घेतला.
सोलापुरात आजही हाताने कोरलं जातं भांड्यावर नाव, कशी आहे पद्धत?
पाळेकरांच्या सल्ल्याने शेतीत उतरला
दुष्यंत सिंह यांच्या यशाची खरी सुरुवात बंगळूरमधील एका शिबिरात झाली, जिथे त्यांची भेट कृषी तज्ज्ञ सुभाष पाळेकर यांच्याशी झाली. पाळेकर यांच्या नैसर्गिक शेतीच्या सल्ल्याने दुष्यंत खूप प्रेरित झाले. त्यांनी पाळेकर यांनी सांगितलेल्या पद्धतीने शेती सुरू केली आणि त्यांची मेहनत फळाला आली. आज दुष्यंत सिंह यांची ओळख उत्तर प्रदेशातील एक यशस्वी आणि प्रतिष्ठित शेतकरी म्हणून झाली आहे.
कमी पाणी लागणाऱ्या धानाची निवड
दुष्यंत कुमार सिंह प्रामुख्याने काळा भात ज्याला Black Salt Rice ची शेती करतात. पांढऱ्या भातामुळे सध्या शुगरचं प्रमाण वाढत आहे. त्यामुळे तांबडा भात, काळ्या भाताची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. पहिल्यांदा चार बिघा जमिनीवर या धान्याने 60 क्विंटलपर्यंत धान्य आलं. विशेष म्हणजे, मागील चार वर्षांपासून ते काळ्या भाताची लागवड करत असल्याने त्यांना मोठी कमाई केली आहे. त्यांनी केमिकल फ्री शेती केली आहे. कोणत्याही खताचा वापर न करता ते उत्पन्न घेतात.
दुष्यंत यांनी आरोग्य लक्षात घेऊन पूर्णपणे नैसर्गिक शेती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांना 5000 रुपयांचा एक बिघामागे खर्च आला. यासोबतच ते पशुपालन देखील करतात, ज्यामुळे त्यांना शेतीसाठी आवश्यक असलेले सेंद्रिय खत मिळते. एका बिघासाठी त्यांचा सरासरी खर्च ४,००० ते ५,००० रुपये येतो, तर प्रति बिघा ६०,००० रुपये नफा होतो. या हिशोबाने, ६५ बिघांमधून त्यांना ३९ लाख रुपयांपर्यंतचा निव्वळ नफा होण्याची अपेक्षा आहे, तर त्यांचा एकूण लागवड खर्च फक्त ३ लाख रुपये आहे. दुष्यंत यांचे हे यश नोकरीपेक्षा शेतीतही मोठे भविष्य आहे, हे सिद्ध करते.
