विशेष बाब म्हणजे, अदिबा अनम ही महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला IAS अधिकारी झाली आहे. तिच्या या अभूतपूर्व यशाने केवळ यवतमाळ शहरातच नव्हे, तर संपूर्ण राज्यात आनंदाची आणि गौरवाची भावना निर्माण झाली आहे.अदिबाने या महत्त्वपूर्ण परीक्षेच्या तयारीसाठी हज हाऊस IAS प्रशिक्षण संस्थेत मार्गदर्शन घेतले. त्यानंतर तिने दिल्लीतील प्रतिष्ठित जामिया मिलिया इस्लामियाच्या निवासी प्रशिक्षण संस्थेत कठोर परिश्रम केले. तिच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे आणि जिद्दीचे हे फळ आहे.
advertisement
अदिबाच्या या प्रेरणादायी यशामुळे अनेक विद्यार्थी, विशेषतः मुस्लिम समाजातील मुली, निश्चितच प्रेरित होतील. प्रतिकूल परिस्थितीतही कठोर मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाने मोठे यश संपादन करता येते, हे अदिबाने सिद्ध केले आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
माझे वडील रिक्षा चालवतात, घरची परिस्थिती देखील बेताची आहे. मात्र घरच्यांनी कधीही या गोष्टीचं प्रेशर माझ्यावर टाकलं नाही. खूप जास्त सपोर्ट केला, त्यांच्या या सपोर्टमुळे मला हे यश मिळालं असंही ती म्हणाली. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण तिने जिल्हा परिषदेच्या शाळेतून पूर्ण केलं. त्यानंतर तिने पुण्यात ग्रॅज्युएशनचं शिक्षण घेतलं. तिच्या मामांनी तिला IAS कसं काम करतात याचा गाइडन्स दिला. त्यानंतर तिचा निश्चय पक्का झाला. सेवा ENGO कडून फायनान्शियली सपोर्ट मिळाला असंही ती म्हणते.
