बापाचा संकल्प, मुलाचा संघर्ष
रूपसिंह सोलंकी हे अनेक वर्षांपासून प्रशासकीय सेवेत ड्रायव्हर म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी अप्पर कलेक्टर सृष्टी देशमुख (IAS) आणि एडीएम के. आर. बडोदे यांच्यासारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गाड्या चालवल्या आहेत. या अधिकाऱ्यांच्या सान्निध्यात राहून त्यांनी दृढ निश्चय केला होता की, त्यांचा मुलगाही एक दिवस अधिकारी होईल हे स्वप्न त्यांनी पाहिलं. बस्स वडिलांनी पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी ऋतिक झटत आहे. याच संकल्पाला पूर्ण करण्यासाठी त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने स्वतःच्या गरजा कमी केल्या. कपडे आणि इतर खर्चांत कपात केली, इतकेच नव्हे तर जमीन विकून त्यांनी ऋतिकला दिल्लीला पाठवले, जेणेकरून तो दिल्ली विद्यापीठातून शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षांची तयारी करू शकेल.
advertisement
महत्त्वाकांक्षेला मिळाली यूट्यूबची साथ
ऋतिकने डी.यू. मधून बी.ए. पूर्ण केले आणि कॉलेजमधूनच त्याने यूपीएससीसह एमपीपीएससीची तयारी सुरू केली. आर्थिक अडचणींमुळे त्याला महागड्या कोचिंग क्लासेसमध्ये जाणे शक्य नव्हते. पण ऋतिक सांगतात की, यूट्यूब आणि ऑनलाइन लेक्चर्समुळे तयारीमध्ये मोठी मदत झाली. ज्या कोचिंग संस्थांपर्यंत पोहोचणे शक्य नव्हते, तिथे यूट्यूबमुळे ते पोहोचू शकले. त्याने एनसीईआरटीच्या पुस्तकांद्वारे आपला पाया मजबूत केला आणि कोचिंग नोट्सच्या मदतीने निरंतर अभ्यास चालू ठेवला.
ट्रेझरी ऑफिसर ते सीईओ
२०२२ मध्ये ऋतिकने एमपीपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून ट्रेझरी ऑफिसर (ATO) म्हणून पद मिळवले आणि जुलै २०२४ मध्ये अलीराजपूर येथे पहिली जॉइनिंग दिली. पण त्याने येथेच थांबायचे ठरवले नाही. एकाच वर्षानंतर, २०२३ च्या परीक्षेत त्याने पुन्हा यश मिळवले आणि यावेळी त्याची निवड जनपद पंचायतचे मुख्य कार्यपालन अधिकारी (CEO) म्हणून झाली. ऋतिक आपल्या आई-वडिलांबद्दल बोलताना भावनिक होतो. तो म्हणतो, "माझ्या आई-वडिलांसारखे कोणी नाही. त्यांनी माझ्या स्वप्नांसाठी स्वतःच्या इच्छांचा त्याग केला. त्यांनी जर हिम्मत दाखवली नसती, तर मी कदाचित इथपर्यंत पोहोचू शकलो नसतो."
गावांचा विकास हेच ध्येय
ऋतिक सांगतात की, मुलाखतीत त्यांना खंडवाचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व, दादाजी धूनीवाले यांचा अध्यात्मिक वारसा, ओंकारेश्वरचे योगदान आणि गायक किशोर कुमार यांच्याशी असलेला खंडवाचा संबंध याबद्दल प्रश्न विचारण्यात आले होते, ज्यांची उत्तरे त्यांनी आत्मविश्वासाने दिली. ऋतिकला त्याचे वडील नेहमी अधिकाऱ्यांशी भेटायला लावायचे आणि प्रामाणिकपणे काम करण्याचा सल्ला द्यायचे. हेच अधिकारी त्याचे प्रेरणास्थान ठरले. गावाचा विकस करणं हे त्याचं ध्येय आहे, त्याची नाळ मातीशी जोडलेली असल्याने गावाच्या समस्या विकास त्याला महत्त्वाचा वाटतो.
