बारावीनंतर मुद्रा यांनी मुंबईतील एका मेडिकल कॉलेजमध्ये बीडीएस (डेंटल) अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. अभ्यासात सातत्य आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी डेंटल शिक्षणातही उत्कृष्ट कामगिरी केली आणि गोल्ड मेडल मिळवलं. यानंतर त्यांचा प्रवास एका यशस्वी डॉक्टरकडे वळण्याची शक्यता होती, मात्र त्यांच्या आयुष्यात वडिलांचं एक अपूर्ण स्वप्न होतं . IAS अधिकारी होण्याचं. मुद्रा गैरोला यांचे वडील स्वतः या सेवेत यावं अशी इच्छा बाळगून होते, मात्र ती पूर्ण होऊ शकली नव्हती.
advertisement
पित्याचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी मुद्रा यांनी एमडीएसचे शिक्षण अर्धवट सोडले आणि UPSC परीक्षेची तयारी सुरू केली. 2018 आणि 2019 मध्ये त्यांनी UPSC परीक्षेचा इंटरव्ह्यू राउंडपर्यंत मजल मारली, मात्र अंतिम यश मात्र हुलकावणी देत राहिलं. 2020 मध्ये तर त्या मुख्य परीक्षेतही पात्र ठरल्या नाहीत. सलग तीन वर्षे अपयश आल्यावरही त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. त्यांनी स्वतःला पुन्हा तयार केलं आणि अभ्यास सुरू ठेवला.
ट्रेड वॉरमधून भारताला लागला ‘जॅकपॉट’; स्मार्टफोन,टीव्ही स्वस्त होणार; इलेक्ट्रॉनिक्सवर जबरदस्त सवलत!
या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून 2021 मध्ये त्यांना UPSC परीक्षेत 165 वी रँक मिळाली आणि त्यांची IPS सेवेसाठी निवड झाली. मात्र, त्यांची अंतिम ध्येयपूर्ती तिथे झाली नाही. 2022 मध्ये त्यांनी पुन्हा एकदा UPSC परीक्षा दिली आणि यावेळी 53 वी रँक मिळवत IAS अधिकारी म्हणून निवड झाली. आपल्या वडिलांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवणाऱ्या मुद्रा गैरोला यांची ही कहाणी UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठा प्रेरणास्त्रोत ठरते.
