PSI झालेल्या या तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान चर्चेत आहे. ही वाट जरी वळणाची बळ येऊदे हिमतीला..! झुंझार होऊनी ललकार आसमनाला..! लाऊनी कपाळी माती.. झेप घे क्षितिजा पाठी हुंकार भरारीसाठी पेटुदे मनाच्या वाती..! हे शब्द या तरुणाने प्रत्यक्षात खरे करुन दाखवले आहेत. PSI तरुणाला हे सांगताना अक्षर: रडू कोसळत होतं. आईनं सोसलेला त्रास तो प्रसंग सगळा अंगावर येणारा होता. ती आई होती तिने लेकरासाठी त्याग केला त्याचं जीच या PSI तरुणाने केले आहे.
advertisement
या PSI तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्याने नेमकं काय घडलं ते सांगितलं, माझ्या आईचा एक पाय मोडला होता. तिला प्रचंड त्रास होत होता, ऑपरेशन करावं लागणार होतं, त्यासाठी पैसे न देता तिने माझ्यासाठी पैसे दिले. ती रडत त्रास सहन करत होती माझ्यासाठी ती लढत राहिली. तिने माझ्या स्पर्धा परीक्षांसाठी पैसे दिले आणि त्याच प्रयत्नात PSI मध्ये मला यश आलं. आईचे आशीर्वाद खूप मोलाचे असतात.
View this post on Instagram
advertisement
