TRENDING:

पुण्याच्या 8 वर्षांच्या अन्वीची आंतराष्ट्रीय स्तरावर दमदार कामगिरी, जगभरातून होतंय कौतुक!

Last Updated:

पुण्यातील आठ वर्षीय अन्वी दीपक हिंगे हिने बँकॉक येथे झालेल्या एशियन युथ चेस चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेत Girls Under Eight Group मध्ये भारतासाठी सलग तीन सुवर्णपदक जिंकण्याचे ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे: आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा डंका वाजत असतानाच आता पुण्यातील आठ वर्षीय अन्वी दीपक हिंगे या बँकॉक येथे झालेल्या एशियन युथ चेस चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेत Girls Under Eight Group मध्ये भारतासाठी सलग तीन सुवर्णपदक जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या ऐतिहासिक कामगिरीचे अधिक माहिती लोकल 18 शी बोलताना अन्वी हिंगे यांनी दिली.
advertisement

आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे नाव उज्वल करणारी चमकदार कामगिरी करत अन्वी हिंगे हिने नुकत्याच थायलंड येथील बँकॉक येथे झालेल्या अशियन युथ चेस चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेत Girls Under Eight Group मध्ये तीन सुवर्णपदकांचे ऐतिहासिक कमाई केली आहे. अन्वी दीपक हिंगे ही मूळची पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील अवसरी गावची आहे. चिंचवड येथील एल प्रो इंटरनॅशनल स्कूलमध्ये अन्वी तिसऱ्या इयत्तेत शिक्षण घेते. यापूर्वी देखील अन्वीने अनेक जागतिक स्तरावरील स्पर्धेत सहभाग घेत पदकांची कमाई केली आहे. एप्रिल महिन्यात ग्रीस येथे झालेल्या स्पर्धेत अन्वीने भारतासाठी सिल्वर मेडलची कमाई केली होती.

advertisement

पुढे ताजिकिस्तानमध्ये झालेल्या वेस्टन एशिया स्पर्धेतसुद्धा अन्वीने सिल्वर मेडल जिंकले होते. तर नुकत्याच मलेशिया येथे पार पडलेल्या कॉमनवेल्थ येथे झालेल्या बुद्धिबळ स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला होता. अन्वी हिंगेने सांगितले की,"वयाच्या पाचव्या वर्षापासून मला बुद्धिबळ खेळात रस निर्माण झाला. घरात भाऊ बुद्धिबळ खेळत असल्याने मला देखील खेळात आवड निर्माण होत गेली. स्पर्धा खेळत असताना कॉन्फिडन्स नेहमीच असायचा, स्पर्धेची तयारी करत असताना पुस्तक वाचणे, पझल सोडवणे, या माध्यमातून स्पर्धेची तयारी करायचे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
स्वप्नांचा झाला 'लाल चिखल', टोमॅटोला भाव नसल्यामुळे 2.50 लाखांचं नुकसान, Video
सर्व पहा

अन्वीच्या या यशामागे तिचे सातत्यपूर्ण सराव, पालकांचे मार्गदर्शन, बुद्धिबळ खेळाची आवड आणि स्वतःला असलेला विश्वास ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. लहान वयातच आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करून अन्वी हिंगेने विद्यार्थ्यांसमोर आदर्श उभा केला आहे.

मराठी बातम्या/Success Story/
पुण्याच्या 8 वर्षांच्या अन्वीची आंतराष्ट्रीय स्तरावर दमदार कामगिरी, जगभरातून होतंय कौतुक!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल