पाणी नाही म्हणून रडला नाही तोडगा काढला
2017 मध्ये गहू, जव, हरभरा आणि मोहरीसारखी पारंपरिक पिकं सोडून आधुनिक शेती सुरू केली. 9 वर्षांपूर्वी पॉलीहाऊसमध्ये काकडीची लागवड सुरू केली. त्यांनी ज्या भागात शेती सुरू केली तिथे पाण्याची समस्या खूप भीषण असते. या समस्येवर मात करण्यासाठी त्यांनी संपूर्ण शेतात ड्रिप सिस्टिम बसवली. यामुळे सिंचनाची समस्या पूर्णपणे दूर झाली आणि उत्पादनात मोठी वाढ झाली. सोनाराम असं या शेतकऱ्याचं नाव आहे. हा शेतकरी राजस्थानमधील सीकर जिल्ह्यातील दातारामगड भागातील लामिया या भागातील रहिवासी आहे.
advertisement
सरकारी मदतीने उभारले पॉलीहाऊस
सोनाराम यांनी पारंपरिक शेतीऐवजी आधुनिक शेतीचा वापर करुन लाखो रुपयांची कमाई केली आहे. त्यांच्या या मेहनतीमुळे युवा शेतकऱ्यांसमोर एक नवीन आदर्श उभा राहिला आहे. त्यांची राज्यात प्रगतीशील शेतकरी म्हणून देखील ओळख निर्माण झाली आहे. सोनाराम यांनी सांगितले की, त्यांच्याकडे एकूण 14 बिघा जमीन आहे. त्यापैकी 9 वर्षांपूर्वी त्यांनी 4000 चौरस मीटर क्षेत्रात पॉलीहाऊस तयार केलं. यासाठी त्यांना एकूण 32 लाख रुपये खर्च आला. मात्र, सरकारी सबसिडी मिळाल्यामुळे त्यांना फक्त 10 लाख रुपयेच खर्च करावे लागले, तर उर्वरित 22 लाख रुपयांची रक्कम त्यांना परत मिळाली.
नफा 20 लाख रुपयांवर पोहोचला
सोनाराम यांनी सुरुवातीला फक्त 2 लाख रुपये खर्च करून काकडीची लागवड सुरू केली आणि पहिल्याच हंगामात त्यांना 2 लाखांहून अधिकचा नफा मिळाला. 2023 रोजी त्यांना काकडी आणि पारंपरिक पिकांमधून 12 लाख नफा. 2024 मध्ये हा नफा वाढून 16 लाख पर्यंत पोहोचला. या चालू वर्षात त्यांना 20 लाख हून अधिक नफा मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. हा नफा दोन हंगामातील असल्याचं ते म्हणाले.
नैसर्गिक खतांचा वापर, 45 टन काकडीचे उत्पादन
सोनाराम त्यांच्या पॉलीहाऊसमध्ये सुमारे 7000 काकडीची रोपे लावतात. येथे नियंत्रित तापमान आणि आर्द्रता असल्यामुळे अवघ्या 40 दिवसांतच रोपे फळे देऊ लागतात. प्रत्येक रोपातून एका हंगामात सुमारे 60 किलो काकडीचे उत्पादन मिळते. अशा प्रकारे, ते एका हंगामात 40 ते 45 टनपर्यंत काकडीचे उत्पादन घेतात. ते वर्षातून दोन वेळा (फेब्रुवारी ते मे आणि जुलै ते ऑक्टोबर) काकडीचे पीक घेतात.
औषधांचा वापर करत नाहीत
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सोनाराम काकडीच्या शेतीत कोणत्याही प्रकारच्या रासायनिक औषधांचा वापर करत नाहीत. चांगले उत्पादन आणि पिकाला दीर्घायुष्य मिळावे म्हणून ते स्वतःच्या शेतात नैसर्गिक खत तयार करतात. यासाठी त्यांनी दुर्गापुरा संशोधन केंद्रात जाऊन खत बनवण्याचे प्रशिक्षण घेतले आहे. ते गोमूत्र, शेण, रुई , धोतरा, खींप इत्यादी वस्तू एका ड्रममध्ये टाकून तीन ते चार महिन्यांसाठी कुजण्यासाठी ठेवतात आणि नंतर ४ महिने याचाच उपयोग पिकासाठी करतात.
