संध्याकाळी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत ही दुकान सुरू असते आणि या काळात इथे चांगलीच गर्दी पाहायला मिळते. चिकन चिलीची अर्धी प्लेट फक्त ७० रुपये तर फुल प्लेट १३० रुपयांना मिळते. एक सिंगल एग रोल ३० रुपयांना मिळतो.
स्थिर नोकरी, पण कुटुंबापासून दूर राहण्याची वेदना
परसराम साहू सांगतात की, त्यांनी ही दुकान सुरू करून ११ वर्षे झाली. पण, यापूर्वीची १३ वर्षे ते वाराणसीमध्ये एका रेस्टॉरंटमध्ये शेफचं काम करत होते. तिथे त्यांना अनुभव मिळाला, मेहनतीने काम केले आणि स्थिर उत्पन्नही होते. मात्र, कामात स्थिरता असूनही कुटुंबापासून, मुलाबाळांपासून दूर राहिल्यामुळे त्यांना मानसिक ताण येत होता. रोजची ती कुटुंबापासून दूर राहण्याची चिंता त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती.
advertisement
५० हजारांची गुंतवणूक, आज लाखमोलाचा व्यवसाय
केवळ ही मानसिक वेदना आणि मुलांसोबत राहण्याची इच्छा यातूनच त्यांनी छत्तीसगडला परत येण्याचा आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा धाडसी निर्णय घेतला. फक्त ५० हजार रुपयांच्या गुंतवणुकीतून त्यांनी रस्त्यावरचा आपला हा छोटा ठेला सुरू केला. आज हा छोटा ठेला त्यांची आर्थिक स्थिती बदलून टाकत आहे. परसराम सांगतात की, ते दररोज ५,००० रुपयांपेक्षा जास्त कमाई करतात आणि सुट्ट्या, सणांच्या दिवसांत तर हे उत्पन्न आणखी वाढते.
परसराम यांच्या मते, कुटुंबासाठी घेतलेला तो छोटासा निर्णय आज त्यांच्या आत्मविश्वासाची आणि आत्मनिर्भरतेची सर्वात मोठी गुरुकिल्ली ठरला आहे. १३ वर्ष त्यांनी नोकरी केली आणि त्यानंतर त्यांनी कुटुंबासाठी ती सोडण्याचा निर्णय घेतला. परसराम साहू यांची ही कहाणी शिकवते की, कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा आणि कुटुंबासाठी घेतलेला एक योग्य निर्णय तुमच्या आयुष्यात मोठी क्रांती घडवू शकतो. त्यांनी स्थिर उत्पन्न देणारी नोकरी सोडली आणि केवळ ५० हजार रुपयांच्या हिमतीवर आपले स्वतःचे 'साम्राज्य' उभे केले. त्यांचं हे छोटंसं दुकान छत्तीसगढ इथल्या चकरभांठा इथे असल्याची माहिती मिळाली आहे.
