व्यवसायात यश आणि मोठी कमाई
सुनीलने हळूहळू आपला व्यवसाय वाढवला आणि आता ते दररोज तब्बल 5-6 क्विंटल चिकन विकतात, ज्यामुळे त्यांची रोजची विक्री 50,000 ते 60,000 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. यातून त्यांना दररोज 3,000 ते 4,000 रुपयांचं उत्पन्न मिळतं. तो महिना 1 लाखापेक्षाही जास्त कमवतो आहे.
घाऊक आणि किरकोळ व्यवसायात प्रावीण्य
advertisement
सुनील फक्त थेट ग्राहकांनाच नाही, तर अनेक लहान चिकनची दुकानं आणि धाब्यांना सुद्धा चिकन पुरवतो, ज्यामुळे त्यांचा व्यवसाय सतत वाढत आहे. चिकन मागवण्याच्या पारंपरिक पद्धतीऐवजी सुनीलने आता फोनवरून ऑर्डर घेण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे वेळेची बचत झाली आहे आणि व्यवसाय अधिक व्यवस्थित झाला आहे.
आज सुनील माहिलांगे त्या तरुणांसाठी एक प्रेरणास्रोत बनले आहेत, जे नोकरीच्या शोधात आहेत. त्यांनी हे दाखवून दिलं आहे की जर योग्य दिशेने कष्ट केले, तर कोणताही छोटा व्यवसाय यशस्वी आणि फायदेशीर बनवता येतो.
हे ही वाचा : दुकान छोटी, कमाई मोठी! जिथे बसायला जागा नाही, तिथे धंदा जोरदार अन् 3 जण करतात व्यापार!
हे ही वाचा : गावातच उभारला उद्योग, लोकांच्या हाताला दिलं काम, आता 'हा' तरुण करतोय लाखोंची उलाढाल!