विभा आणि स्नेहा या दोघी बहिणी आहेत आणि त्या दोघी उत्तम अशा डान्स कोरियोग्राफर देखिल आहेत. विशेष म्हणजे या दोघी बहिणी एकाच शाळेत डांस टिचर म्हणून देखिक काम करत होत्या. परंतु स्वतःचा व्यवसाय करावा या करता त्यांनी कोरोना पूर्वी एक कॅफे देखिक सुरू केला होता. परंतु अचानक आलेल्या लॉकडाउन मुळे त्यांचा नवीनच व्यवसाय हा त्याना बंद करावा लागला.
advertisement
व्यवसाय बंद झाल्यानंतर काहीतरी काम हवे या करता त्यांनी पुन्हा नोकरी करण्याचा विचार केला. परंतु नोकरीत काही रस राहिला नाही, या करता या दोघी बहिणींनी डांस क्लासेस घेण्यास सुरवात केली. परंतु, यात पण पाहिजे तसे पैसे मिळत नसल्याने त्यांनी पुन्हा आपण फूड बिझनेस करू शकतो या विचाराने एक छोटी सुरवात आता केली आहे.
सकाळी डांस क्लासेस घेऊन या दोघी तरुणी संध्याकाळी एका छोट्या हातगाडीवर पिज्जा आणि पिज्जा पाणीपुरी असे पदार्थ एकदम कमी भावात विक्री करत असतात. कॅफेचा जुना अनुभव असल्याने या दोघी तरुणी उत्तम असे खाद्य पदार्थ बनवत असतात . यामुळे रोज संध्याकाळी यांच्या गाडीवर मोठी गर्दी होत असते आणि या माध्यमातून या दोघी चांगली कमाई देखील करू लागल्या आहेत. तुम्हाला देखील यांची नवीन पिज्जा पाणीपुरी ही खायची असल्याने यांच्याकडे नक्की भेट द्या.