जेईई परीक्षा चांगल्या मार्काने पास होण्यासाठी अनेक विद्यार्थी कठोर परिश्रम करतात दिवस-रात्र ही करतात. त्यात अनेक विद्यार्थी यशस्वी होतात आणि त्यांची चर्चा देशभरात होते. सध्या अशा दोन विद्यार्थ्यांची चर्चा सर्वत्र होत आहे. नेमकं काय घडलं याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे.
दोन भावांची जेईईत 'जुळी' भरारी
स्पर्धेच्या जगात दोन जुळ्या भावांनी आपल्या मेहनतीने वेगळी ओळख निर्माण केली आहे. महरूफ अहमद खान आणि मस्रूर अहमद खान या जुळ्या भावांनी JEE Main 2026 परीक्षेत तब्बल '99.9984543' टक्के गुण मिळवत यश प्राप्त केले आहे. यात विशेष म्हणजे दोघांचे गुण शेवटच्या अंकापर्यंत अगदी सारखे आहेत.
advertisement
असा होता दोघांचा प्रवास
या दोघांचा प्रवास ओडिशातील भुवनेश्वरपासून सुरू होऊन कोटा येथे पोहोचला. लहानपणापासूनच त्यांनी एकाच शाळेत शिक्षण घेतले. एकाच कोचिंग क्लासमध्ये प्रवेश घेतला आणि एकाच स्वप्नासाठी दोघा भावांनी मेहनत घेतली. ज्यात त्यांनी एकत्र अभ्यास केला, एकत्र परीक्षा दिली आणि यशही एकत्र मिळवले.
त्यांच्या यशामागे त्यांच्या आईचे मोठे योगदान आहे. ज्या डॉ. झीनत बेगम या सरकारी सेवेत कार्यरत स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. यात विशेष गोष्ट म्हणजे मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी तीन वर्षे स्वतःचे करिअर थांबवून कोटा येथे राहण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ज्यात मुलांच्या आरोग्याची आणि मानसिक ताकदीची पूर्ण काळजी घेतली.
शिक्षकांचे लाडके आणि अभ्यासात हुशार
दोघही भावंडं शाळेपासून अतिशय हुशार विद्यार्थी होती. ज्यात दहावीत महरूफने 95.2 टक्के तर मस्रूरने 97.2 टक्के गुण मिळवले होते. दोघांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडमध्ये जवळपास 30 सुवर्णपदके जिंकली आहेत. आता दोघांचे ही पुढील लक्ष्य आयआयटी मुंबईमधून संगणक अभियांत्रिकी पदवी मिळवण्याचे आहे.
