ही समस्या सामान्य नाही, परंतु निष्काळजीपणा किंवा तांत्रिक बिघाडामुळे होऊ शकते. म्हणून, एसी ब्लास्ट का होतात आणि ते कसे टाळता येईल हे समजून घेणे आवश्यक आहे.
इलेक्ट्रिकल समस्या - एसीमध्ये जास्त करंट किंवा वायरिंगमध्ये बिघाड झाल्यामुळे शॉर्ट सर्किट होऊ शकते. यामुळे एसीच्या आत तापमान वाढते आणि आग लागू शकते.
गॅस गळती- एसीमध्ये वापरल्या जाणाऱ्या रेफ्रिजरंट गॅसची गळती होऊन तो स्पार्कशी आदळला तर त्याचा स्फोट होऊ शकतो. गॅस गळतीमुळे एसीलाही आग लागू शकते.
advertisement
अँड्रॉइड स्मार्टफोनचे हे 5 फीचर्स तुम्हाला माहितीये का? सोपी करतील तुमची कामं
जास्त गरम होणे- एसी बराच वेळ सतत चालला तर त्याची मोटर आणि इतर भाग गरम होतात. जर उष्णता जास्त वाढली तर त्यामुळे आग लागू शकते.
देखभालीचा अभाव- एसीची वेळेवर सर्व्हिसिंग न केल्याने, एसीमध्ये धूळ साचते, वायर सैल होऊ शकतात, कूलेंट लीक होऊ शकतात. या सर्व गोष्टींमुळे एसी स्फोट होण्याचा धोका वाढतो.
चुकीचे किंवा बनावट भाग वापरणे- मूळ भागांच्या जागी स्वस्त आणि बनावट भाग बसवल्याने एसीची कार्यक्षमता बिघडते आणि स्फोट होण्याचा धोका वाढतो.
एअर फिल्टर ब्लॉकेज- एअर फिल्टर स्वच्छ केले नाहीत तर हवेचा प्रवाह थांबतो. यामुळे मोटरवर जास्त दबाव येतो आणि एसी खराब होऊ शकतो किंवा स्फोट होऊ शकतो.
व्होल्टेज चढउतार- वीज पुरवठ्यातील चढउतार एसीच्या इलेक्ट्रॉनिक भागांना नुकसान पोहोचवू शकतात. हे देखील स्फोट होण्याचे एक कारण असू शकते.