Washing Machine : तुमच्या ही वॉशिंग मशिनमध्ये धुतलेल्या कपड्यांना येतो का घाणेरडा वास? मग खरी समस्या 'इथे' आहे
- Published by:Devika Shinde
Last Updated:
काळानुसार या रबर सीलमध्ये बुरशी तयार होऊ लागते. जर तिची योग्य वेळी स्वच्छता केली नाही, तर हा वास केवळ मशीनमध्येच नाही तर कपड्यांमध्येही शोषला जातो.
मुंबई : आपण कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन वापरतो, पण अनेकदा धुतलेल्या कपड्यांतून खूप घाणेरडा वास येतो आणि आपल्याला वाटतं की कपड्यातच काहीतरी असेल, ज्यामुळे हा घाणेरडा वास जात नाही आहे. पण खरं कारण बहुतेक वेळा कपड्यात नसतं, तर वॉशिंग मशीनच्या दरवाज्याला किंवा जॉइंट्सला लागलेल्या रबर सीलमध्ये लपलेलं असतं.
हीच सील धुण्याच्या वेळी पाणी बाहेर जाण्यापासून थांबवते, पण त्याचबरोबर साबण, घाण, लिंट आणि ओलावा यांचंही घर बनते.
काळानुसार या रबर सीलमध्ये बुरशी तयार होऊ लागते. जर तिची योग्य वेळी स्वच्छता केली नाही, तर हा वास केवळ मशीनमध्येच नाही तर कपड्यांमध्येही शोषला जातो. त्यामुळे वॉशिंग मशीनची रबर सील नियमितपणे साफ करणं खूप महत्त्वाचं आहे.
advertisement
रबर सील स्वच्छ ठेवणं का गरजेचं?
रबर सील साफ करणं म्हणजे फक्त दुर्गंधी काढणं नाही, तर वॉशिंग मशीनचं आरोग्य जपणं आहे. वेळोवेळी केलेली सफाई केवळ बुरशीपासून बचाव करत नाही, तर सीलचं आयुष्य वाढवते. कारण जर ही सील खराब झाली, तर पाणी गळू शकतं आणि ती बदलण्यासाठी मोठा खर्च करावा लागतो.
फ्रंट-लोड वॉशिंग मशीनमध्ये, दरवाज्याभोवती असलेली मोठी रबर सील जास्त ओलसर राहते आणि तिथे सर्वाधिक घाण साचते. अशी सील कपड्यांवर बुरशी निर्माण करू शकते, पाण्याच्या निचर्यात अडथळा निर्माण करू शकते आणि कधी-कधी गळतीसुद्धा होऊ शकते.
advertisement
किती वेळा सफाई करावी?
प्रत्येक धुण्यानंतर ती कोरड्या किंवा ओल्या कपड्याने पुसणं चांगलं आहे, पण ते पुरेसं नाही. तज्ज्ञ महिन्यातून किमान एकदा रबर सीलची खोलवर सफाई करण्याचा सल्ला देतात.
रबर सील कशी स्वच्छ कराल?
यासाठी महागडे केमिकल्स लागणार नाहीत. फक्त एक मऊ कपडा, कोमट पाणी, हलकं कीटाणुनाशक किंवा पांढरा व्हिनेगर वापरा, जुना टूथब्रश आणि एक कोरडा टॉवेल वापरा.
advertisement
सफाईची पद्धत:
एका वाडग्यात कोमट पाण्यात थोडं व्हिनेगर किंवा क्लीनर मिसळा. मऊ कपडा त्या पाण्यात भिजवा, पिळून घ्या आणि संपूर्ण रबर सील काळजीपूर्वक पुसा. विशेषत: दुमडलेल्या भागांना आणि कोपऱ्यांना नीट स्वच्छ करा.
हट्टी डाग किंवा बुरशी असल्यास टूथब्रशने हलकेच घासा. शेवटी कोरड्या टॉवेलने पुसून ओलसरपणा राहू देऊ नका. प्रत्येक धुण्यानंतर वॉशिंग मशीनचं दार थोडं उघडं ठेवा, जेणेकरून आत हवा खेळती राहील. ही छोटीशी सवय तुमच्या वॉशिंग मशीनचं आयुष्य वाढवेल आणि कपडे नेहमी ताजेतवाने ठेवेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 06, 2025 3:47 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Washing Machine : तुमच्या ही वॉशिंग मशिनमध्ये धुतलेल्या कपड्यांना येतो का घाणेरडा वास? मग खरी समस्या 'इथे' आहे