याचा अर्थ असा की, सध्या वापरात असलेले बहुतेक डिव्हाइस असुरक्षित आहेत. प्रभावित ब्रँडमध्ये Samsung, OnePlus, Realme, Redmi, Xiaomi, Oppo, Vivo आणि Motorola यांचा समावेश आहे. या असुरक्षितता प्रामुख्याने Qualcomm, MediaTek, Nvidia, Broadcom आणि Unisoc सारख्या कंपन्यांनी उत्पादित केलेल्या चिपसेटशी संबंधित आहेत.
WhatsApp वर मिळणार ही खास सुविधा! पाहा काय आहे Cross-Platform Chats फीचर
advertisement
CERT-In ने म्हटले आहे की, हॅकर्स तुमच्या डिव्हाइसवर नियंत्रण मिळविण्यासाठी, डेटा चोरण्यासाठी किंवा त्यात बदल करण्यासाठी या सुरक्षा त्रुटींचा फायदा घेऊ शकतात. या हल्ल्यांमध्ये दुर्भावनापूर्ण अॅप्स किंवा मालवेअर असू शकतात, जे तुमचा डेटा धोक्यात आणू शकतात. एजन्सीने याला High Risk असल्याचे वर्णन केले आहे आणि सर्व यूझर्सना त्यांचे डिव्हाइस त्वरित अपडेट करण्याचे आवाहन केले आहे.
तुमच्या फोनमधील Apps तुम्हाला ट्रॅक तर करत नाहीये ना? लगेच बदला ही सेटिंग
तुमचे Android डिव्हाइस कसे सुरक्षित करावे
- Settings> About Phone वर जाऊन लेटेस्ट अँड्रॉइड व्हर्जन तपासा.
- किंवा अपडेट तपासण्यासाठी सेटिंग्जमध्ये Software Update शोधा.
- जर अपडेट उपलब्ध असेल तर ते डाउनलोड करा आणि इंस्टॉल करा.
- इंस्टॉल केल्यानंतर, सर्व बदल प्रभावी होतील याची खात्री करण्यासाठी तुमचा फोन रीस्टार्ट करा.
- अँड्रॉइड यूझर्सच्या सुरक्षिततेसाठी नियमितपणे सॉफ्टवेअर अपडेट करणे आणि संशयास्पद अॅप्स डाउनलोड करणे टाळणे अत्यंत महत्वाचे आहे.
