जुलै महिन्यात सगळ्या प्रायव्हेट टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्ज प्लॅनच्या किमतीत मोठी वाढ केली होती. त्यानंतर सगळ्यांच्या बजेटवर परिणाम झाला. त्यामुळे प्रत्येक जण आपल्याला जास्तीत जास्त फायदा मिळेल, अशा प्लॅनच्या शोधात असतो, जेणेकरून कमीत कमी पैसे मोजून अधिकाधिक सुविधांचा लाभ घेता यावा. असा एअरटेलचा एक प्लॅन असून, त्याची किंमत 100 रुपयांपेक्षाही कमी आहे. त्या प्लॅनबद्दल जाणून घेऊ या.
advertisement
एअरटेलच्या या रिचार्ज प्लॅनची किंमत 99 रुपये आहे. त्यात अनलिमिटेड डेटाची मजा घेता येते. या प्लॅनची व्हॅलिडिटी फक्त दोन दिवस आहे. याचाच अर्थ असा, की ज्यांना थोड्या कालावधीसाठी खूप जास्त प्रमाणात इंटरनेट वापरायचं असेल, त्यांच्यासाठी हा प्लॅन अत्यंत उपयुक्त आहे. ज्यांच्याकडे आधीच एखादा प्लॅन अॅक्टिव्ह असेल, त्यांनाच हा 99 रुपयांचा प्लॅन अॅक्टिव्ह करता येईल. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दर दिवशी वीस जीबी डेटा देण्यात येतो.
100 रुपयांपेक्षा कमी किमतीचा प्लॅन
हा प्लॅन जिओच्या प्लॅनसारखा वाटू शकतो; मात्र त्यात फरक आहे. जिओ कंपनीदेखील अशा प्रकारे 100 रुपयांपेक्षा कमी किमतीचा प्लॅन देते. जिओचा प्लॅन 86 रुपयांचा आहे. तो प्लॅन 28 दिवसांचा आहे. यात 28 दिवसांसाठी 14 जीबी डेटा दिला जातो. या प्लॅनमध्ये कॉलिंग किंवा एसएमएससारखे बेनिफिट्स मिळत नाहीत.
प्लॅनच्या किमती वाढल्याने ग्राहकांना भुर्दंड
ग्राहकांनी आपापल्या गरजेनुसार रिसर्च करून कोणताही रिचार्ज प्लॅन घेतल्यास फायदेशीर ठरतं. कारण आता प्लॅनच्या किमती वाढल्याने ग्राहकांना भुर्दंड पडतो. काही प्लॅन्समध्ये सुविधा भरपूर असतात; मात्र त्या सगळ्या सुविधा प्रत्येक ग्राहकाच्या उपयोगाच्याच असतात असं नाही. त्यामुळे आपण नेमकं काय वापरतो, काय पाहतो, कशासाठी फोनचा जास्त वापर करतो, याचा अभ्यास करून रिचार्ज करावं.