Amazon Prime Membership Price
अमेझॉनची ही ऑफर प्राइम शॉपिंग एडिशन, प्राइम लाइट आणि प्राइम या तिन्ही सबस्क्रिप्शनवर उपलब्ध आहे. प्राइम शॉपिंग एडिशन मेंबरशिपची किंमत 399 रुपये (वार्षिक) आहे, परंतु कंपनी सध्या 100 रुपयांची सूट देत आहे, डिस्काउंटनंतर तुम्ही ही मेंबरशिप 299 रुपयांना (वार्षिक) खरेदी करू शकता.
ट्रेडिंग अॅप्स वापरणाऱ्यांनो सावधान! सरकारचा इशारा, रिकामं होऊ शकतं बँक अकाउंट
advertisement
कंपनी सामान्यतः प्राइम लाईट मेंबरशिपसाठी दरवर्षी 799 रुपये आकारते, परंतु आता प्राइम डे ऑफर अंतर्गत, कंपनी 200 रुपयांची सूट देत आहे. डिस्काउंटनंतर तुम्हाला ही मेंबरशिप 599 रुपयांना मिळेल. याशिवाय, कंपनीच्या एक वर्षाच्या प्राइम मेंबरशिपसाठी तुम्हाला 1499 रुपये द्यावे लागतील. परंतु आता प्राइम डे ऑफरनंतर, 500 रुपयांची सूट दिली जात आहे. याचा अर्थ असा की जर तुम्ही आता या ऑफरचा फायदा घेतला तर तुम्हाला फक्त 999 रुपयांमध्ये 1499 रुपयांची मेंबरशिप मिळेल.
फोन हॅक करण्याचा धोकाच राहणार नाही, असा सेट करा स्ट्राँग Password
5% कॅशबॅक प्रोग्राम देखील सुरू झाला आहे
अमेझॉन केवळ मेंबरशिपवर 500 रुपयांपर्यंत सूट देत नाही. तर कंपनीने अलीकडेच प्राइम आणि नॉन-प्राइम ग्राहकांना कॅशबॅक देण्यासाठी रिवॉर्ड गोल्ड प्रोग्राम सुरू केला आहे. या रिवॉर्ड प्रोग्राम अंतर्गत प्राइम मेंबर्स आणि नॉन-प्राइम मेंबर्सना किती कॅशबॅक दिला जाईल? जर तुम्हालाही याबद्दल माहिती हवी असेल तर येथे क्लिक करा.
