iPhone 17 Air मध्ये 6.5-इंचाचा डिस्प्ले दिला आहे, जो 120Hz ProMotion रिफ्रेश रेट सपोर्ट करतो. याचा अर्थ असा की स्क्रीनवर अॅनिमेशन आणि स्क्रॉलिंग आता आणखी आरामात होईल. लॉक स्क्रीनवर हा रिफ्रेश रेट 1Hz पर्यंत कमी होतो, ज्यामुळे फोनची बॅटरी आणखी वाचणार आहे.
advertisement
iPhone 17 Air मध्ये सुरक्षेचा विचार करण्यात आला आहे. यामध्ये फ्रंट आणि मागे Ceramic Shield दिली आहे, त्यामुळे फोन पडला तरी काही होणार नाही, एवढंच फोनवर स्क्रॅच सुद्धा येणार नाही, असा दावा कंपनीने केला आहे. पण, या फोनमध्ये एकच कॅमेरा दिला आहे. जो उत्तम फोटो आणि चांगले व्हिडीओ रेकॉर्ड करू शकतो, असा दावा Apple ने केला आहे.
या फोनमध्ये Apple चं नवीन A19 Pro चीप लावण्यात आली आहे. जी स्मार्टफोन इंडस्ट्रीमध्ये सर्वात पॉवरफुल आहे ही चिप ऑन-डिवाआस AI प्रोसेसिंगला सपोर्ट करतोय, ज्यामुळे अॅप्स आणि गेम आरामात खेळता येईल. iPhone 17 Air हा चार रंगात उपलब्ध आहे. iPhone स्लिम आणि स्टायलिश श्रेणीची नवीन आहे.
iPhone 17 Air हा ज्या लोकांना बारीक आणि वजनाने हलका आणि हा. परफॉर्मेंस फोन पाहिजे आहे, त्यांच्यासाठी तयार केला आहे. या फोनमध्ये 120Hz डिस्प्ले आणि A19 Pro चिप दिली आहे.