MacRumorsनं दिलेल्या वृत्तानुसार, iPhone 15चा रिअर पॅनल iPhone 14 सारखाच असणार आहे. पण, यावेळी या पॅनलमध्ये फ्रॉस्टेड ग्लास असू शकते. ही एक मोठी गोष्ट आहे, कारण कंपनी फक्त प्रो मॉडेल्समध्ये या ग्लासचा वापर करत आली आहे. नियमित iPhone 15 ची फ्रेम अॅल्युमिनियममध्ये असू शकते आणि डाव्या बाजूला सायलेंट बटण असेल.
advertisement
iPhone 15 फोनमध्ये 6.1 इंचाचा सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले असेल. ज्यामध्ये 2532×1170 पिक्सेलचं रिझोल्युशन मिळू शकतं. iPhone 15 Plus मध्ये 6.7-इंचाचा डिस्प्ले असू शकतो ज्याचं रिझोल्युशन 2778 x 1284 असेल. म्हणजेच तो iPhone 15 पेक्षा थोडा मोठा असेल. यामध्ये 60Hz रिफ्रेश रेट दिसू शकतो. यावेळी कंपनी यामध्ये देखील डायनॅमिक आयलंड फीचर देऊ शकते. मागील सीरिजमध्ये हे फीचर फक्त प्रो मॉडेल्समध्ये उपलब्ध होते.
सर्वात आधी iPhone नावाचा फोन कोणी लॉन्च केला?
बॅटरीची पॉवर किती असेल?
iPhone 15 मध्ये 3,877mAh आणि iPhone 15 Plus मध्ये 4,912mAh क्षमतेची बॅटरी असू शकते. या सीरिजसह, कंपनी फोनमध्ये USB-C चार्जिंग पोर्ट समाविष्ट करणार आहे. कंपनी बॉक्समध्येच USB-C टू USB-C केबल देऊ शकते.
कॅमेरा क्वॉलिटी कशी असेल?
iPhone 15 आणि iPhone 15 Plus मध्ये ƒ/1.6 अपर्चरसह 48MP सोनी सेन्सर असण्याची शक्यता आहे. iPhone 14 मध्ये 12 मेगापिक्सेलची लेन्स होती. कंपनी iPhone 15 कॅमेराच्या बाबतीत एक मोठा अपग्रेड आणत आहे. या फोनमध्ये एक 12-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड सेन्सरदेखील असेल, ज्यात ƒ/2.4 अपर्चरसह असेल. डायनॅमिक आयलंडमध्ये असलेला फ्रंट कॅमेरा 12 मेगापिक्सेलचा असल्याचे सांगण्यात येत आहे.
चिपसेट आणि रॅममध्ये काय बदल असतील?
रेग्युलर मॉडेल्समध्ये, कंपनी मागील वर्षीच्या सीरीजमधील Apple A16 Bionic हाच चिपसेट देईल. हे आयफोन 14 रेग्युलर मॉडेलमध्ये असलेल्या A15 बायोनिकपेक्षा सात टक्के वेगवान असल्याचं म्हटलं जातं. फोन 6 GB रॅम आणि 128 GB च्या प्रारंभिक व्हेरिएंटसह येऊ शकतो.
कलर ऑप्शन काय असतील?
कलर ऑप्शन्सबद्दल बोलायचं झालं तर कंपनी निळसर, हलका निळा, काळा, स्टारलाईट, पिवळा आणि कोरल गुलाबी रंगांमध्ये हा हँडसेट लाँच करू शकते. यूजर्स आयफोन 15 सीरिजची आतुरतेनं वाट पाहत आहेत.
किती असेल किंमत?
iPhone 15 ची किंमत 799 डॉलर्सपासून (अंदाजे 65,000 रुपये) सुरू होऊ शकते. तर, iPhone 15 Plusची किंमत 899 डॉलर्सपासून (अंदाजे 75,000 रुपये) सुरू होऊ शकते.
